Hyundai Venue च्या किमतीत वाढ, ग्राहकांना मोजावे लागणार जास्त पैसे

टाइम्स मराठी | वाढत्या लोकसंख्येमुळे कार खरेदी करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. यामध्ये खास करून लोक 5 सीटर कारला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. सध्या Hyundai च्या venue कारला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे या कारची बाजार मागणी वाढली आहे. मात्र अशा स्थितीतच हुंडाई कंपनीने त्याच्या स्टँडर्ड व्हेरियंटची किंमत 5,300 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे आता आपल्याला हुंडाई venue कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आता Hyundai Venue ची एक्स- शोरूम किंमत 7.68 लाख रुपये असेल.

   

Hyundai Venue

Hyundai Venue च्याएसयूव्हीमध्ये कंपनीने तीन इंजिन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिन, 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5- लिटर डिझेल इंजिन असे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, ग्राहकांसाठी सहा वेगवेगळ्या ट्रिम्स देण्यात आल्या आहेत. ज्यात E, S, S+, S(O), SX आणि SX(O) यांचा समावेश आहे. खास म्हणजे, Hyundai कंपनीने नुकतेच Venue Night Edition नावाचे खास मॉडेल सादर केले आहे.

Venue Engine

Night Edition मॉडेल दोन इंजिनांसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.0-लिटर T-GDI पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. या नवीन मॉडेल मध्ये स्किड प्लेट्स, अलॉय व्हील्स, रूफ रेल, ORVMs, शार्क-फिन अँटेना आणि रूफ रेल हे सर्व ब्लॅक कलरमध्ये देण्यात आले आहे. मॉडेल लोगोचा कलर देखील ब्लॅक आहे. कारचा ऍथलेटिक लुक लाल फ्रंट ब्रेक कॅलिपर्सने हायलाइट केला आहे.

Colour

यासोबतच ह्युंदाईचा लोगो डीप क्रोममध्ये देण्यात आला आहे. एसयूव्हीच्या बाहेरील भागासाठी 4 मोनोटोन आणि एक ड्युअल-टोन कलर पर्याय उपलब्ध आहेत. ज्यात फायरी रेड, फायरी रेड, टायटन ग्रे, अॅटलस व्हाईट आणि अॅबिस ब्लॅकसह अॅबिस ब्लॅक अशा कलरचा समावेश आहे. त्यामुळे हे मॉडेल ग्राहकांसाठी आकर्षित ठरत आहे. तसेच, याला तितक्याच मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

Venue Price

या नवीन मॉडेलची मागणी बघता कंपनीने तिची किंमत 10 लाखापासून पुढे ठेवली आहे. यामध्ये , SX(O) Night DCT ड्युअल टोन या टॉप एंड मॉडेलसाठी 13 लाख मोजावे लागत आहेत. गेल्या महिन्यातच Hyundai कंपनीने आपली नवीन मायक्रो एसयूव्ही Xeter लाँच केली होती. ज्याची बुकिंग आतापर्यंत 50 हजार युनिट्सच्या पुढे गेली आहे. आता Venue Night Edition ला देखील मोठी मागणी होत आहे.