BMW ने लाँच केल्या 2 लक्झरी कार; आकर्षक लूक अन दमदार फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड BMW ने भारतीय बाजारपेठेमध्ये दोन नवीन कार लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही गाडयांची नावे i7 M70 xDrive आणि  740d M स्पोर्ट अशी आहेत. कंपनीने या दोन कार लॉन्च करत इलेक्ट्रिक I7 आणि ICE 7 सिरीज मध्ये आणखीन दोन कार समाविष्ट केल्या आहेत. BMW i7 M70 xDrive या कारची एक शोरूम किंमत 2.50 करोड रुपये एवढी असून 740d M sport या कारची किंमत 1.81 करोड रुपये एवढी आहे. या दोन्ही कार मॉडेल 8 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. जाणून घेऊया या कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन

i7 M70 xDrive ही इलेक्ट्रिक BMW कार असून या मॉडेलमध्ये कंपनीने ट्वीन मोटर सेटअप उपलब्ध केले आहे. ही मोटर 650 hp पॉवर आणि 1015 nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या मोटरला पावर देण्यासाठी यामध्ये 101.7 किलो वॅट लिथियम आयन बॅटरी उपलब्ध करण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार 560 किलोमीटर इतकं अंतर पार करते.

डिझाईन

i7 M70 xDrive या इलेक्ट्रिक कार मध्ये स्पेसिफिक बंपर, साईड स्कर्ट, मिरर, अलॉय आणि रियल स्पॉयलर देण्यात आले आहे. यासोबतच कंपनीने स्वारोवसकी  क्रिस्टल, हेडलाईट, ब्लॅक आउट फ्रंट ग्रील, विंडो लाईन आणि ब्ल्यू एम कॅलिपर्स देखील उपलब्ध केले आहेत. तसेच कॉन्ट्रास्टिंग रुफ सह ड्युअल टोन फिनिशिंग देखील यामध्ये देण्यात आली आहे.

इंटेरियर डिझाईन

i7 M70 xDrive या इलेक्ट्रिक मॉडेलच्या इंटेरियर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये लेदर स्टिअरिंग व्हील, रूफ लाइनर आणि 6 अपहोस्ट्री उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर BMW इंडिव्हिज्युअल अपहोस्ट्रीचे देखील ऑप्शन यामध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार ९ अपहोस्ट्री तीन इंटिरियर ट्रिम ऑप्शन उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक मॉडेलच्या फ्रंट साईडने ड्युअल स्किन, एक्सिक्युटीव्ह लाऊंज सीटिंग, सीटच्या मागच्या साईडने थिएटर स्क्रीन, बोवर्स आणि विल्किंग डायमंड ऑडिओ सिस्टीम, फोर झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, सॉफ्ट क्लोज डोअर्स यासारखे बरेच फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत.

740d M स्पोर्ट स्पेसिफिकेशन

740d M स्पोर्ट या कार मॉडेलमध्ये 3.0 लिटर इन लाईन सहा सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 286 hp पावर आणि 650 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 48 V इलेक्ट्रिक मोटर देखील उपलब्ध करण्यात आली आहे. हि मोटर 18 HP पावर आणि 200 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करण्यात आले आहे.