चालू गाडीचे ब्रेक फेल झालेत? घाबरू नका, फक्त ‘हे’ काम करा

टाइम्स मराठी । रस्त्यावर वाहनांच्या वाढत्या संख्येवरून आपण अंदाज लावू शकतो की, कार चालवणे किती लोकांना आवडत असेल. त्यातच गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाणही मोठया प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे कार चालवताना सावधानी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. बरेचदा कोणत्या न कोणत्या चुकीमुळे कार एक्सीडेंट झाल्याच्या घटना आपण ऐकत असतो. काही वेळा असं होतं की गाडी चालवत असताना हायवेवर अचानकच स्पीड मध्ये चालणाऱ्या गाडीचे ब्रेक फेल होतात. किंवा ब्रेक व्यवस्थित काम करत नाहीत. यावेळी अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशावेळी घाबरून न जाता नेमकं काय करावं म्हणजे आपली गाडी कंट्रोल मध्ये राहील हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

   

1) गाडीचे स्पीड कमी करत ब्रेक लावण्याचा प्रयत्न करा-

कार चालवताना किंवा कार शिकत असताना आपल्याला सतत ब्रेक कडे लक्ष द्या असं सांगितलं जातं. चालू गाडीमध्ये तुमच्या कारचे ब्रेक फेल झाल्यास घाबरून जाऊ नका. अशावेळी तुम्हाला शांत राहून निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड कमी करत ब्रेक लावण्याचा प्रयत्न करा. आणि कार पहिला गिअरवर आणा. यावेळी सतत ब्रेक लावत रहा. जेणेकरून ब्रेक पुन्हा लागण्याची शक्यता असते.

2) हैजार्ड लाईट चालू करा-

कारचे ब्रेक फेल झाल्यावर हैजार्ड लाईट अर्जंट चालू करा. जेणेकरून आपल्या मागील कार चालकाला कार खराब झाल्याचे किंवा काहीतरी धोका असल्यास कळेल. त्याचबरोबर तुम्ही यावेळी कारचा हॉर्न देखील कंटिन्यू वाजवू शकतात.

3) स्पीड कमी करून गियर बदला-

कारचे ब्रेक फेल झाल्यावर घाबरून न जाता विचार करून निर्णय घ्या. कार स्पीड मध्ये असेल तर हळूहळू स्पीड कमी करून गेअर चेंज करा. परंतु रिवर्स गेअर चा उपयोग करू नका. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त वाढते. त्याचबरोबर कारमधील एसी फुल करा. जेणेकरून इंजिन वर दबाव पडेल आणि कार ची स्पीड कमी होईल.

4) हॅन्ड ब्रेक वापरा –

कारचे ब्रेक लागत नसतील तर स्पीड कमी करणे, ब्रेक लावत राहणे, कार पहिल्या गिअर वर आणणे, हे सर्व पर्याय करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी हॅन्ड ब्रेक लावणे गरजेचे आहे. फुल स्पीड मध्ये हॅन्ड ब्रेक लावल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची कार कंट्रोल मध्ये आहे, तुमच्या कारची स्पीड कमी झालेली आहे. तेव्हाच हॅन्ड ब्रेक लावल्याने तुमची कार थांबेल.