तुम्हाला वारंवार अडचणी येत असतील तर ‘या’ घटना ठरू शकतात पितृदोष कारण

टाइम्स मराठी । पितृपक्षामध्ये प्रत्येक जण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत असतो. आपल्या पितरांना स्मरण करून त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करत असतात. प्रत्येक पितरांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध पिंडदान देखील केले जाते, परंतु तुमच्यावर तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद असेल तर तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या घटना घडत असतात. जर पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर नसेल तर एका मागोमाग एक संकटे तुमच्या जीवनावर येत असतात. तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्याने वारंवार दुःख भोगावे लागतात. जर तुमच्या बाबतीत देखील अशा काही घटना वारंवार घडत असतील तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल, आजारपण वाढलेले असेल, घरातील सदस्य एकमेकांसोबत शत्रूच्या भावनेने पाहत असतील तर तुमच्यावर तुमचे पितर नाराज आहेत असे समजू शकता. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही संकेतांबद्दल सांगणार आहोत. जे संकेत पितृदोष असल्याचे सूचित करत असतात, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

   

आपल्याला पितृदोष आहे की नाही हे समजण्यासाठी प्राथमिक कारण म्हणजे तुमची जन्मपत्रिका. तुमच्या जन्मपत्रिकेच्या माध्यमातून देखील तुम्हाला पितृदोष आहे की नाही हे समजून घेता येते. याकरिता तुम्हाला ज्योतिषांकडे जाऊन तुमची पत्रिका दाखवणे गरजेचे आहे. घरातील एखाद्या सदस्याला शारीरिक आजार सतावत असेल, एखादा गंभीर आजार तसेच मानसिक ताणतणाव जाणवणे. सर्प दंश होऊन वारंवार स्वप्नामध्ये साप दिसणे, साप चावणे. जर तुम्हाला नेहमी मानसिक अशांती जाणवत असेल जसे की मन घाबरणे काहीतरी वाईट घडणार आहे याची चाहूल लागणे, मन विचलित राहणे, वारंवार कसली तरी भीती वाटणे या गोष्टी देखील पितृदोष दर्शवणाऱ्या असू शकतात.

नदी किंवा समुद्र पाहून भीती वाटणे. रात्री झोपताना वाईट स्वप्न पडणं, निद्रानाश होणे, स्वप्नामध्येच वेगवेगळे वाईट दृश्य दिसणं, मध्येच दचकून जाग येणे, जीव घाबरणे, नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहेत अशा काही हालचाली जाणवणे. दानधर्म कुलाचार पूजा अर्चना करत असताना अडचणी निर्माण होणे. अनेकदा काही गोष्टी व्यक्तिगत पातळीवर देखील घडताना दिसून येतात तसे की वैवाहिक जीवन जगत असताना अडचणी निर्माण होणे. मतांमध्ये भिन्नता निर्माण होणे, घरामध्ये पाणीपुरवठा कमी होणे, पैसा कमी होत जाणे, आर्थिक अडचणी भासून कर्जाचा डोंगर आपल्यावर दिवसं दिवस वाढत जाणे. घरामध्ये शुभकार्य न घडणे, वारसा हक्क जाणे, घरातील सदस्य एकमेकांसोबत वारंवार भांडत असतील, घरामध्ये चांगल्या गोष्टी घडत नसतील तर अशावेळी देखील तुमच्यावर पितृदोष आहे असे म्हटले जाते अशावेळी तुम्हाला योग्य ते पाऊल उचलना देखील गरजेचे आहे.

तुमची पत्रिका तज्ञ मंडळींना दाखवणे गरजेचे आहे व त्यानुसार वेगवेगळे विधी व शांती देखील तुम्ही करू शकता वरील सांगितले काही संकेत देखील तुमच्या जीवनामध्ये वारंवार घडत असतील तर याचा अर्थ तुम्हाला पूर्वजांचा दोष लागलेला आहे, अशावेळी या पितृपक्षांमध्ये पितरांच्या तिथीनुसार योग्य ती विधी करून पितरांची शांति करणे गरजेचे आहे. पिंडदान करणे गरजेचे आहे. पूर्वजांच्या नावाने गरिबांना दान देखील करणे हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, अशा काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या जीवनातील पितृदोष दूर करू शकता.