ही चूक केल्यास तुमचं Whatsapp Chat कोणीही वाचेल; वेळीच सावध व्हा

टाइम्स मराठी | सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणाऱ्यांची संख्या सध्या प्रचंड आहे. यासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम व्हाट्सअप फेसबुक यावर युजर जास्त प्रमाणात सक्रिय असतात. अशातच हे प्लॅटफॉर्म यूजर साठी वेगवेगळे फीचर्स आणत असतात. जेणेकरून युजर्सला ॲप वापरताना नवनवीन अनुभव मिळावे. जरी युजर साठी फीचर्स लॉन्च करण्यात येत असले तरीही प्रायव्हसी हा मुद्दा संपत चालल्याचा दिसत आहे.

   

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिल्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच व्हाट्सअप वर आज-काल सर्वच काम होतात. यापूर्वी हे फक्त इन्स्टंट मेसेज होते. परंतु आता पर्सनल ऑफिशियल सर्वच कामे व्हाट्सअप च्या माध्यमातून केले जातात. परंतु आपण केलेली प्रायव्हेट चॅट ही सिक्युअर आहे का ? हा प्रश्न निर्माण होतो. आपल्या व्हाट्सअप वर कोणी लक्ष ठेवून तर नाही ना असे वेगवेगळे प्रश्न प्रत्येक युजरच्या मनात येत असतात. बऱ्याचदा आपल्या चुकांमुळे आपली प्रायव्हेट चॅट इतरांच्या हाती लागू शकते. तर जाणून घेऊया आपण सतत करत असलेल्या काही चुका , ज्यामुळे प्रायव्हेट चॅट प्रायव्हेट राहत नाही.

Whatsapp ला लॉक न लावल्यास

आपला स्मार्टफोन कोणी वापरू नये यासाठी बरेच जण पॅटर्न लॉक , फिंगरप्रिंट लॉक लावत असतात. परंतु व्हाट्सअप लॉक लावणे प्रत्येक जण विसरून जातात. त्यामुळे तुमचे व्हाट्सअप ओपन करून कोणीही चॅट वाचू शकते. त्यामुळे तुमच्या व्हाट्सअप ला देखील लॉक लावणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमची चॅट कोणीच वाचणार नाही.

थर्ड पार्टी ॲप वापरू नये

बरेच जण व्हाट्सअप ऐवजी थर्ड पार्टी ॲप वापरतात. या थर्ड पार्टी ॲप मध्ये जरी चॅट लॉक हे फीचर दिलेले असेल तरीही ते सिक्युअर नाही. थर्ड पार्टी ॲपमुळे तुमचा डाटा लिक होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. या थर्ड पार्टी ॲपमुळे तुमचा डाटा सिक्युअर आणि प्रायव्हेट राहत नाही. म्हणून थर्ड पार्टी वापरणे टाळले पाहिजे.

लॉग आऊट न केल्यास

बरेच युजर्स मल्टिपल व्हाट्सअप अकाउंट लॉगिन या फीचर च्या माध्यमातून वेगवेगळ्या डिव्हायसेस मध्ये व्हाट्सअप ओपन करतात. परंतु व्हाट्सअप ओपन केल्यानंतर ते लॉगिन करणेच विसरून जातात. लॉगिन नो केल्यामुळे तुमची प्रायव्हेट चॅट कोणीही वाचू शकते. त्यामुळे युजरने कधीही इतरांच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप लॉगिन केल्यास लॉग आऊट करण्यास विसरू नये. म्हणजेच तुमची चॅट सुरक्षित राहील.

वेबसाईट आणि परमिशन

बरेच युजर्स कोणत्याही वेबसाईटला किंवा ॲपला विचार न करता परमिशन देतात. परंतु व्यवसाय आणि आमच्या माध्यमातून देखील डेटा लीक होण्याची प्रचंड शक्यता असते. यामुळे सायबर क्राईम देखील होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आणि याचा परिणाम व्हाट्सअप वर देखील मोठ्या प्रमाणात पडतो.