Mobile वरून Photo क्लीक करा आणि 5 लाखांचे बक्षीस जिंका; कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । Mobile वरून Photo क्लीक करून तुम्हाला 5 लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. वाचून थोडं नवल किंवा आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने ही ऑफर आणली आहे. विवो कंपनीने ऑपरेशनल एक्सपर्ट Warner Bros आणि Discovery यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. त्यानुसार आता विवोने एक इमेजिंग स्मार्टफोन फोटोग्राफी अवॉर्डची घोषणा देखील केली आहे. याबाबत कंपनीने सांगितलं की, स्मार्टफोन फोटोग्राफीची कला सेलिब्रेट करण्यासाठी ही स्मार्टफोन स्पर्धा घेण्यात येत आहे. जर तुम्ही देखील या इमॅजिन स्मार्टफोन फोटोग्राफी अवॉर्ड मध्ये भाग करू इच्छित असाल तर याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या .

   

स्पर्धेत भाग घेण्यासाठी या वेबसाईटवर करावे लागेल रजिस्ट्रेशन

या इमॅजिन स्मार्टफोन फोटोग्राफी अवार्ड मध्ये ६ कॅटेगरीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ६ कॅटेगरीमध्ये नेचर, पोर्ट्रेट, नाईट मोशन, आर्किटेक्चर आणि कल्चर हे ऑप्शन्स आहेत. हा इव्हेंट 25 ऑगस्ट पासून सुरू झाला असून तुम्हाला देखील यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमची बेसिक माहिती आणि स्वतःचे रजिस्ट्रेशन वेबसाईटवर जाऊन करावे लागेल. यासाठी www.vivoimagine.com वेबसाईटवर जाऊन तुम्ही बेसिक डिटेल्स, फोटो अपलोड आणि कॅटेगिरी सिलेक्ट करू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला भरलेली संपूर्ण माहिती सबमिट करावी लागेल. या स्पर्धेमध्ये विवो युजरने भाग घेण्यासाठी काही गाईडलाईन्स देखील ठेवण्यात आले आहे.

जिंकणाऱ्याला मिळणार ‘हे’ बक्षीस

या इमॅजिन स्मार्टफोन फोटोग्राफी अवार्ड मध्ये भाग घेतल्यानंतर शॉर्टलिस्टेड पार्टिसिपेटर्सला विनीत वोहरा, राकेश पुलपा, आमिर वाणी यासारख्या फेमस फोटोग्राफरचे मास्टर क्लास अटेंड करण्याचा चान्स मिळू शकतो. एवढेच नाही तर या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या विनरला ग्रेड ग्रँड प्राईस 5 लाख रुपये आणि vivo X90 Pro स्मार्टफोन देण्यात येईल. यासोबतच विवोग्राफर बनण्याची संधी देखील मिळेल.

डिस्कवरी यासारख्या प्लॅटफॉर्मवर करण्यात येईल फोटोज पब्लिश

इमॅजिन इंग्रजी स्मार्टफोन फोटोग्राफी अवार्डमध्ये जिंकलेल्या व्यक्तींचे फोटोज Warner Bros आणि Discovery यासारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पब्लिश करण्यात येणार आहे. यासोबतच विवोच्या सोशल मीडिया पेजवरदेखील हे फोटोस पब्लिश करण्यात येतील.

जर तुम्ही या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करू इच्छित असाल तर तुम्हाला खालील गाईडलाईन्स पाळाव्या लागतील.

1) पार्टिसिपेटर हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
2) पार्टिसिपिटल चे वय 18 वर्षा पर्यंत असणे गरजेचे आहे.
3) ही स्पर्धा खास Vivo स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ठेवण्यात आली आहे त्यामुळे युजर्स ला त्यांच्या विवो फोनची डिटेल्स द्यावी लागेल.

या इव्हेंट साठी कोणतीच फीस ठेवण्यात आली नसून विवो चे कोणतेच प्रॉडक्ट किंवा सर्विसेस युजर्स ला खरेदी करावे लागणार नाही. या काँटेस्ट मध्ये विवो स्मार्टफोन युजर साठी एक्सक्लुझिव्ह ठेवण्यात आले आहे.