सातवी शिकलेल्या आजोबांनी बनवली सुसाट धावणारी इलेक्ट्रिक रिंग बाईक; व्हिडीओ बघून व्हाल थक्क

टाइम्स मराठी | आपल्या प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे एक तरी बाईक असावी. परंतु पैशाच्या अभावी बाईक घेण्याचे स्वप्न पुर्ण करता येत नाही. मात्र सुरतमध्ये एका सातवी पास असणाऱ्या व्यक्तीने चक्क बाईकची हौस भागवण्यासाठी स्वतःच एक नविन बाईक तयार केली आहे. नटुभाई असे या आजोबांचे नाव असून त्यांनी इलेक्ट्रिक रिंग बाईक तयार केली आहे. सध्या त्यांनी बनवलेल्या बाईकचे सुरतमध्ये चांगलेच कौतुक होत आहे. तर अनेकांनी त्यांच्या या बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

   

कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय नटुभाई यांनी इलेक्ट्रिक रिंग बाईक तयार केली आहे. नटुभाई हे एका गॅरेजमध्ये कार रिपेरिंगचे काम करतात. तसेच ते फक्त इयत्ता सातवीपर्यंत शिकलेले आहेत. कार रिपेरिंग करत असताना त्यांना हे वाटले की आपण देखील असे काहीतरी तयार करू शकतो. यासाठी मग त्यांनी बाईक बनवण्यासाठी आवश्यक असणारी सर्वसाधारण सामग्री गोळा केली. आणि या इलेक्ट्रिक रिंग बाईकला तयार केले. सुरुवातीला कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र आपणच ही बाईक तयार केल्याचे पुरावे दाखवल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नटुभाई यांनी तयार केलेली इलेक्ट्रॉनिक बाईक इतर मोटरसायकल प्रमाणे काम करते. तसेच या बाईकला एक गोल आकाराची आकर्षित अशी रिंग देखील बसवण्यात आली आहे. या बाईची रिंग सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेते. बाइकची शोभा वाढवण्यासाठी नटुभाई यांनी ही रिंग बसवली आहे. नटुभाई यांचे वय 65 वर्षे असून ते गेले 42 वर्षे कार रिपेरिंगचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना एखादी कार बनवण्याची सर्व प्रक्रिया माहित आहे. याचाच वापर करून त्यांनी आपल्या स्वतःसाठी ही इलेक्ट्रॉनिक बाईक तयार केली आहे. याचा व्हिडीओ Viralbhagani या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.