टाइम्स मराठी । सप्टेंबर महिन्यामध्ये या राशींच्या व्यक्तींचा वाईट काळ सुरू होणार आहे. जेव्हा चंद्र आणि गुरू दृष्टी किंवा युद्ध करून एकत्र येतात तेव्हा गजकेसरी योग सुरू होतो. या योगाला शाहीराज योग असे देखील म्हटले जाते. यंदा चंद्र शुक्र ग्रहाच्या माध्यमातून तुळ राशी प्रवेश गोचर करत आहे. आणि गुरू हा ग्रह मेष राशीमध्ये आहे. लवकरच गुरु ग्रह चंद्र सोबत 180 डिग्री वर 17 सप्टेंबरला 23 वाजून 7 मिनिटांनी तूळ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. गजकेसरी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्वात शक्तिशाली योग म्हणून ओळखला जातो. जेव्हा गुरु आणि चंद्र हे दोन ग्रह एकमेकांसोबत युती करत असतात , किंवा एकमेकांना प्रत्यक्षरीत्या पाहतात. तेव्हा मोठ्या प्रमाणात ज्ञान शक्ती कीर्ती आणि विलासिता प्रधान होते.
त्याचबरोबर केंद्र भाव चौथ्या सातव्या आणि दहाव्या स्थानामध्ये तयार होत असल्याचं सांगण्यात येतं. जर हा केंद्रभाव पाचव्या नवव्या आणि अकराव्या घरात असेल तर चांगला परिणाम मिळतो. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये हा योग आहे ते अत्यंत बुद्धिमान आदरणीय आणि करिअरमध्ये त्यांचे वर्चस्व कायम टिकून ठेवतात. एवढंच नाही तर समाजात त्यांची प्रतिष्ठा देखील चांगली असते.
काय आहे गजकेसरी योग
गजकेसरी योग हा एक वैदिक शास्त्र मधील शक्तिशाली योग आहे. या योगाला राजयोग देखील म्हटले जाते. संस्कृत मध्ये गज म्हणजे हत्ती असा अर्थ होतो. प्राचीन काळामध्ये हत्तीला राजशाही थाट दाखवण्यासाठी ओळखलं जात होते. गुरु या ग्रहाला शिक्षा, धर्म, ज्ञान आणि धन या तिन्हींचे प्रतीक मानले जाते. आणि चंद्राला दयालुता , समृद्धी, भावनात्मक स्थिरता चे प्रतीक मानले जाते. असे असले तरीही गुरु आणि चंद्राला सहाव्या आठव्या आणि बाराव्या किंवा राहू केतू आणि शनी या तिन्ही अशोक ग्रहांसोबत ठेवल्या जात नाही.
मेष–
मेष राशीतील व्यक्तींवर गजकेसरी योगाचा वाईट परिणाम पाहण्यास मिळतो. या गजकेसरी युगामुळे मेष राशीतील व्यक्तींच्या आयुष्यात प्रचंड प्रॉब्लेम्स उद्भवतील. हा योग पुन्हा एकदा सातव्या आणि पहिल्या घराच्या अक्षावर येईल. म्हणजेच पहिल्या घरात गुरु आणि राहू असेल तर सातव्या घरात चंद्र आणि केतू यांची युती होईल. या काळामध्ये मेष राशीतील व्यक्तींवर मानसिक तणाव निर्माण होईल. आणि गुरु ग्रहासोबतच छायाग्रह राहू सोबत चंद्र आणि गुरु हे ग्रह एकत्र आल्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये अशांतता असेल. एवढेच नाही तर अशांतता राहिल्यामुळे वैवाहिक जीवन तुटू शकते. हा काळ फक्त 2.5 दिवसांपर्यंत राहील. त्यानंतर चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल.
कर्क
कर्क या राशीतील व्यक्तींसाठी गजकेसरी योग हा चतुर्थ भाव आणि दर्शन भाव अक्षामध्ये असेल. त्याचवेळी चंद्र हा चतुर्थ घरात केतू सोबत युती करेल. त्यामुळे घरगुती वातावरण आणि व्यावसायिक जीवन अडचणी देऊ शकते. मोठ्या प्रमाणात भांडण देखील होऊ शकतात. एवढेच नाही तर तुमच्यात आणि वरिष्ठांमध्ये प्रचंड अडचणी येतील. आणि तुमची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब होईल. या काळात तुमची नोकरी जाण्याची देखील संकेत आहेत. यासोबतच तुमच्या आईचे खराब आरोग्य आणि वैवाहिक जीवन धोक्यात येईल.
तूळ –
तूळ राशीच्या लोकांसाठी सातव्या भावात राहू आणि गुरु एकत्र येतील, ज्यावर पहिल्या घरात चंद्र आणि केतूचा प्रभाव असेल, त्यामुळे या लोकांना गजकेसरी योगमुळे अडचणींचा सामना करावा लागेल. विशेषत: तुमच्या वैवाहिक जीवनासाठी हा काळ खूप कठीण जाईल. तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येऊ शकतील आणि तुम्हाला संघर्ष करण्याचीही वेळ येऊ शकते . हा योग तुम्हाला हार्मोनल समस्या किंवा इतर कोणताही विकार देऊ शकतो. या काळात तुमचे आरोग्य चिंतेचा विषय असू शकते.
धनु –
सप्टेंबर महिन्यात धनु राशीच्या लोकांना त्यांच्या प्रेम जीवनाशी संबंधित समस्या येऊ शकतात. तुमच्या व्यवसायातील किंवा जवळच्या व्यक्तीकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे. किंवा प्रियकर – प्रेयसीकडून ब्रेकअप होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही निराश व्हाल