टाइम्स मराठी | जूनमध्ये सर्वाधिक खरेदी करण्यात आलेल्या कारची विक्री जुलै महिन्यात खाली कोसळली आहे. अनेक टॉप सेलिंग मध्ये असणाऱ्या कार खालच्या स्तरावर आल्या आहेत. यामध्ये मारुती आणि टाटाच्या सर्वाधिक लोकप्रिय कारचा देखील समावेश आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टॉप सेलिंगमध्ये सर्वाधिक खरेदी करण्यात आलेली कार मारुती स्विफ्ट ठरली आहे. या कारला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. जुलै महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) टॉप सेलिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. यातूनच या कारला मोठी मागणी होताना दिसत आहे.
वॅगनआर कार जूनमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. मात्र तीच आता आठव्या क्रमांकावर आली आहे. या कारसोबत इतर कार देखील घसरल्या आहेत. या सगळ्यात मारुती स्विफ्ट कार नंबर वन ठरली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर बलेनो कार आली आहे. मारुती ब्रेझा ही कार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, एमपीव्ही एर्टिगा चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर क्रेटा कार आहे. तर सहाव्या क्रमांकावर मारुतीची कॉम्पॅक्ट सेडा कार आहे. तिच्यानंतर,मारुती फ्रँक्स सातव्या क्रमांकाची कार ठरली आहे.
जुलै महिन्यात स्विफ्टने एकूण १७,८९६ मोटारींची विक्री केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मारुती सुझुकी WagonR कारच्या १२,९७० युनिट्सची विक्री झाली. याचबरोबर,जुलैमध्ये नेक्सॉन कार नवव्या स्थानावर घसरली आहे. जून महिन्यात ही कार पाचव्या क्रमांकावर होती. या कारच्या विक्रीत जून महिन्याच्या तुलनेत तब्बल १०.५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, Eeco ची विक्री यावर्षी १२,०३७ युनिट्सपर्यंतच झाली होती आहे. या कारच्या किमतीत ८ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात बऱ्याच लोकप्रिय कारची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दुसरीकडे ग्राहक मारुती सुझुकी स्विफ्टकडे जास्त कल दाखवत आहे. या कारमध्ये मायलेज २२.३८kmpl आहे. याच्यासोबत स्विफ्ट CNG मॅन्युअलचे मायलेज ३०.९०km/kg इतके असणार आहे. मारुती सुझुकी स्विफ्टची शो रूम किंमत ५.९९ लाख रुपये आहे. परंतु जर तुम्ही ही कार कंपनीच्या ऑफरमध्ये खरेदी केली तर ती तुम्हाला स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.