भारतातील ‘या’ भागात 18 ऑगस्टला साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन; कारण वाचून हैराण व्हाल

टाइम्स मराठी । नुकताच दोन दिवसांपूर्वी आपण 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा केला. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. दोनशे वर्षांनंतर भारत स्वातंत्र्य झाला होता. एवढ्या वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यानंतर आज भारत सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. आपल्याला हे माहिती आहे की आपला देश हा 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य झाला. आणि आपण 15 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतातील काही ठिकाणी 18 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

   

काय आहे यामागील नेमकं कारण?

पश्चिम बंगाल (West Bengal) हा भारताचा एक भाग असून देखील त्या ठिकाणी असलेल्या काही भागात 15 ऑगस्टला नाही तर 18 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील नदिया आणि मालदा हे जिल्हे स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हते. त्यानंतर 18 ऑगस्टला हे दोन्ही जिल्हे भारतामध्ये सामील करण्यात आले. 12 ऑगस्टला व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी घोषणा करून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. परंतु ब्रिटिश अधिकारी सिरिल रेड क्लिप यांच्या एका चुकीमुळे बंगाल पूर्णपणे वादग्रस्त विषय बनला होता. त्यांच्याकडून पहिल्यांदा चुकीचा नकाशा बनवण्यात आला होता. त्यांनी विभाजनानंतर हिंदू बहुल जिल्हे मालदा आणि नदीया पूर्व पाकिस्तानामध्ये दिले होते. त्यामुळे चूक लक्षात येताच माउंटबॅटन यांनी लगेचच बंगाल विभाजनाचा आदेश पुन्हा लागू केला. त्यानंतर हिंदू बहुसंख्या असणारे जिल्हे भारताला आणि मुस्लिम बहुल असलेले जिल्हे पूर्व पाकिस्तानला सोपवण्यात आले होते.

18 ऑगस्टला कुठे साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन –

ही संपूर्ण प्रक्रिया 17 ऑगस्ट च्या रात्री पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवरील बरेच गाव 15 ऑगस्ट ऐवजी 18 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या यामध्ये शांतीपूर, कल्याणी, बोनगाव, राणाघाट, कृष्णनगर, शिकारपूर आणि करीमपूर या शहरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मालदा जिल्ह्यातील रतुआ आणि दक्षिण दिनाजपूरचे बेलूरघाट गावही १५ ऑगस्टनंतर भारतात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या सर्व ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो