Mobile उत्पादनात भारत ठरला जगातील दुसरा देश; आतापर्यंत बनवले 20 कोटी मोबाईल

टाइम्स मराठी । मोदी सरकारच्या मेक इन इंडिया (Make In India) या उपक्रमाचा मोबाईल (Mobile Production) उद्योगाला मोठा फायदा झाला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यापासून भारतातील मोबाईल उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे आता भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे. 2014 पासून ते 2022 पर्यंत मोबाईल फोन शिपमेंटने दोन अब्जचा टप्पा ओलांडला आहे. यासोबतच मोबाईल उत्पादनामध्ये या काळात 23 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. केंद्र सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह यासारख्या योजनांच्या माध्यमातून स्मार्टफोन सोबतच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळाले आहे.

   

काउंटर पॉईंट यांनी केलेल्या रिसर्च नुसार, मेड इन इंडिया स्मार्टफोनची संख्या दोन अरब युनिट्स पेक्षा जास्त असून स्मार्टफोनचे शिपमेंट 23 टक्क्यांच्या CAGR ने वाढली आहे. या रिसर्च चे डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितलं की, मागच्या वर्षात देशातील स्मार्टफोनची शिपमेंट 98% एवढी होती. यासोबतच नऊ वर्षांपूर्वी हा आकडा 19 टक्क्यांपर्यंत होता. देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी आणि व्हॅल्यू एडिशन साठी मोदी सरकारने विदेशातून इम्पोर्ट होणारे उत्पादन आणि काही महत्त्वाचे कंपोनेंट्स यावर आयात शुल्क वाढवले होते.

काउंटर पॉईंट यांनी केलेल्या रिसर्च नुसार भारतामध्ये बऱ्याच कंपन्या तेजीने त्यांचा व्यवसाय सुरू करत आहेत. यामुळे नोकरी सोबतच मोबाईलच्या प्रोडक्शन वर देखील मोठा परिणाम आढळून आला. प्रॉडक्ट सोबत जोडलेले प्रोत्साहन आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमासह भारत आता जगातील सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे. त्यामुळे स्थानिक मोबाईल निर्माता कंपन्यांना चालना मिळत आहे. भारताचे लक्ष सध्या सेमी कंडक्टर हब बनवण्याकडे असून लवकरच हे लक्ष साध्य होईल.