India Vs Bharat वादात अक्षयकुमारची उडी; थेट चित्रपटाचे नावच बदललं

टाइम्स मराठी । देशात भारत विरुद्ध इंडिया (India Vs Bharat) हा वाद चांगलाच रंगला आहे. केंद्र सरकार आगामी काळामध्ये सर्वच ठिकाणी इंडिया ऐवजी भारत हा शब्द प्रयोग केला जावा यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकार आता संविधानामध्ये देखील बदल करणार असल्याची शक्यता असून विशेष अधिवेशनामध्ये या संबंधित प्रस्ताव आणला जाऊ शकतो. अशातच आता भाजप समर्थक म्हणून ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने देखील भारत Vs इंडिया वादात उडी मारली आहे. अक्षयने थेट त्याच्या चित्रपटाचे नावच बदलून टाकलं आहे.

   

कोणत्या चित्रपटाचे नाव बदललं? India Vs Bharat

लवकरच अक्षय कुमारचा मिशन राणीगंज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिशन राणीगंज या चित्रपटाचे पूर्वी नाव द ग्रेट इंडियन रेस्क्यू असे होते. परंतु भारत विरुद्ध इंडिया हा वाद सुरू झाल्यापासून अक्षय कुमारने या आगामी चित्रपटाचे नाव बदलले. आता हे नाव राणीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू असे ठेवण्यात आले आहे. नुकताच अक्षय कुमारने सोशल मीडियावर या चित्रपटाचे नवीन पोस्टर लॉन्च केले. बुधवारी इंस्टाग्राम अकाउंट वरून अक्षय कुमारने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चित्रपटाचे नाव बदलले.

राणीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू या चित्रपटाचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले आहे. त्याचबरोबर दीप शिका देशमुख ,अजय कपूर , वासू भगनानी, जॅकी भगनानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबतच परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट जसवंत सिंग यांच्या शौर्यावर आधारित आणि सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. 1989 मध्ये जसवंत सिंग यांनी जमिनीखाली 350 फूट अडकलेल्या 65 खान कामगारांना वाचवले होते. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार नवीन अवतारा मध्ये दिसणार आहे.

ही घटना बिहार येथील राणीगंज येथील आहे. या घटनेला मिशन राणीगंज म्हणून ओळखले जाते. यापूर्वी देखील या चित्रपटाचे नाव बऱ्याचदा बदलविण्यात आले. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा चित्रपटाला कॅप्सूल गील असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर द ग्रेट इंडियन रेस्क्यू , आणि आता हे नाव बदलून राणीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू (India Vs Bharat) असं ठेवण्यात आलं आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोंबर ला थेटर मध्ये प्रदर्शित होणार आहे.