India Vs Bharat वादात प्रकाश राज यांची उडी; म्हणाले, कपडे बदलणाऱ्या विदूषकाचे…

टाइम्स मराठी । विरोधी आघाडीचे नाव इंडिया झाल्यानंतर देशांमध्ये भारत विरुद्ध इंडिया या नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता मोदी सरकारने देशाला इंडिया नाहीतर भारत या नावाने (India Vs Bharat) संबोधण्याचा निश्चय केला आहे. g20 परिषदेदरम्यान भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने डिनर इंविटेशन तयार करण्यात आले होते. यामध्ये देखील इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर 15 नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या दस्तऐवजावर देखील भारताचे पंतप्रधान असं छापण्यात आलं होतं. यावरून सध्या भारत वर्सेस इंडिया यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये राजकीय नेत्यांसोबत सेलिब्रिटी देखील मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. अशातच प्रकाश राज यांनी भारत विरुद्ध इंडिया या चर्चेमध्ये मत मांडले आहे.

   

दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) हे सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजातील बऱ्याच घडामोडींवर ते रोखठोकपणे त्यांचं मत मांडतात. काही दिवसांपूर्वी इस्रोच्या चांद्रयान तीन बाबत देखील त्यांनी त्यांचे मत मांडले होते. त्यावेळी त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता प्रकाश राज यांनी इंडिया विरुद्ध भारत (India Vs Bharat) या बद्दल मांडलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.यासोबतच अमिताभ बच्चन जॅकी श्रॉफ यांनी देखील प्रतिक्रिया देऊन मत नोंदवलं.

ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा- (India Vs Bharat)

प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत लिहिले की, “सर्वे ऑफ इंडिया…. कपडे बदलणाऱ्या विदूषकाचे नाव सांगा, जो निवडणुकीच्या कामासाठी देशाचेही नाव बदलत आहे. त्यांनी केलेलं हे ट्विट व्हायरल झालं असून बरेच जणांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.

दरम्यान, बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील इंडिया विरुद्ध भारत या वादावर ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं होते. अमिताभ बच्चन यांनी “भारत माता की जय” असं म्हणत एकप्रकारे भारत या नावाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर जॅकी श्रॉफने देखील ट्विट करत प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ” जर तुम्हाला भारताला भारत म्हणायचे आहे तर काही वाईट नाही, जर तुम्हाला इंडिया म्हणायचे तर इंडिया ही ठीक आहे. आता माझं नाव जॅकी आहे , मला कोणी जॉकी तर कोणी जाकी नावाने हाक मारतो. नाव बदललं याचा अर्थ मी बदलत नाही आणि नाव बदललं तर तुम्ही इंडियन आहात हे विसरू नका.” असं ट्विट त्यांनी केलं.