टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. अशातच आता रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियन आर्मीने एक आर्टिफिशियल इंटेलिजंटवर आधारित डिवाइस डेव्हलप केलं आहे. ज्याचा वापर रोड एक्सीडेंट होण्यापासून थांबवण्यासाठी करता येऊ शकतो. इंडियन आर्मीने डेव्हलप केलेले हे आर्टिफिशियल इंटेलिजंट वर आधारित डिवाइसला पेटंट सर्टिफिकेट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे हे डिवाइस पूर्णपणे डेव्हलप होऊ शकेल.
हे डिवाइस कशा पद्धतीने काम करेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. बऱ्याचदा लांब च्या प्रवासाला जात असताना मोकळ्या रस्त्यावर डुलकी लागते. त्यामुळे रोड एक्सीडेंट होण्याचे प्रमाण वाढते. हा रोड एक्सीडेंट थांबवण्यासाठी हे डिवाइस काम करणार आहे. जेव्हा तुम्हाला प्रवास करताना डुलकी लागेल किंवा झोप येईल अशावेळी हे डिवाइस अलार्म च्या माध्यमातून तुम्हाला सावधान करेल. म्हणजेच हे AI बेस्ड डिव्हाईस रोड एक्सीडेंट होण्यापूर्वीच अलार्म वाजवेल. याबद्दल आर्मीने सांगितलं की, या डिवाइसमुळे रस्त्यावरील जवानांच्या अपघाताचे प्रमाण कमी होईल. आणि प्रवास सुखकर होऊ शकेल.
हे AI बेस्ड डिवाइस इंडियन आर्मी कर्नल कुलदीप यादव यांनी डेव्हलप केलं आहे. 2फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी या डिवाइससाठी पेटंट मिळावं म्हणून निवेदन दिले होते. आता दोन वर्षानंतर हे निवेदन त्यांना मिळालं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजंट बेस्ड एक्सीडेंट प्रेवेंशन सिस्टीमचा पेटंट मिळालं आहे. या एक्सीडेंट प्रेवेंशन डिवाइस ला आर्मीचा रिसर्च आणि डेव्हलपमेंट कंपोनेंट च्या माध्यमातून स्वदेशी रूपामध्ये डेव्हलप केलं गेलं आहे. लांबचा प्रवास करत असताना, डोंगर किंवा हायवेवर गाडी चालवताना ड्रायव्हर थकतो. त्यामुळे अचानक डुलकी लागायला सुरुवात होते. आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. हे थांबवण्यासाठी हे आर्टिफिशियल इंटेलिजंट वर आधारित डिवाइस बनवण्याचा विचार डोक्यात आला असं कर्नल कुलदीप यादव यांनी सांगितलं. सरकारी आकड्यानुसार 2021 मध्ये देशात रस्ते अपघातामुळे एकूण 1.54 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर बस 57% पेक्षा जास्त ट्रक अपघातामध्ये ड्रायव्हरला झोप लागल्याचे निदान स्पष्ट झालं.
आर्टिफिशियल इंटेलिजंट बेस्ड एक्सीडेंट प्रेवेंशन हे डिवाइस वाहन चालकांना सतर्क करण्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. हे डिवाइस ड्रायव्हरच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि गाडी चालवताना ड्रायव्हरला झोप लागली तर मोठ्या आवाजात अलार्म वाजेल. या आवाजामुळे चालकाची झोप उडेल आणि होणारी दुर्घटना टळेल. हे डिवाइस फक्त आर्मीच्या वाहनांमध्येच नाही तर इतर कोणत्याही व्यक्तींच्या वाहनांमध्ये बसवता येऊ शकते. हे डिव्हाईस वाहनांचा डॅशबोर्डवर बसवले जाते. जेणेकरून ते ड्रायव्हरच्या डोळ्यांवर लक्ष ठेवू शकतील.
आर्टिफिशियल इंटेलिजंट वर आधारित या डिवाइसची प्रत्येक ठिकाणी चाचणी घेण्यात आली. हे डिवाइस पर्वत, वाळवंट, महामार्ग या वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. त्यावेळी ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली. त्याचबरोबर आंध्र प्रदेश तेलंगणासह दोन राज्यांच्या परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये देखील हे डिवाइस लावून चाचणी करण्यात आली. यामध्ये देखील ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली.