टाइम्स मराठी । भारतामध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात सोयीस्कर प्रवास हा ट्रेनने (Indian Railways) होत असल्याचे मानले जाते. गर्दीमध्ये हाल करत बस मध्ये चढण्यापेक्षा कमी किमतीत आरामदायी प्रवास करणे प्रत्येकाला आवडत असते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी सोयीस्कर माध्यम म्हणून रेल्वे कडे बघितले जाते. भारतामध्ये दररोज हजारो ट्रेन धावतात . या ट्रेनच्या माध्यमातून करोडो लोक प्रवास करत असतात. या ट्रेनची बऱ्यापैकी नावे आपल्याला माहिती आहेत. आपल्या सर्वांना परिचित असलेल्या एक्सप्रेस राजधानी शताब्दी एक्सप्रेस… या ट्रेन्सने आपण प्रवास करत असतो. यामध्ये आता वंदे भारत ट्रेन देखील सहभागी झाली आहे. परंतु अशा दोन ट्रेन आहेत ज्यांना रस्ता देण्यासाठी वंदे भारत आणि शताब्दी सारख्या ट्रेनला देखील थांबावे लागते. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या दोन ट्रेन.
भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ आहेत स्पेशल ट्रेन– Indian Railways
भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) इंटरसिटी मेल सुपरफास्ट एक्सप्रेस राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस या ट्रेन उपलब्ध आहे. यामध्ये आता वंदे भारत च नाव देखील जोडण्यात आलं आहे. काही वर्षांमध्ये येणाऱ्या बुलेट ट्रेन मध्ये या सर्व ट्रेनचे नाव असेल. भारतीय रेल्वेची एक अर्धदृत गती रेल्वे सेवा असलेली वंदे भारत एक्सप्रेस भारतातील शहरांना जोडण्याचं काम करते. ही भारतीय रेल्वेच्या माध्यमातून चालवली जाणारी एक कमी अंतराची रेल्वे सेवा आहे. वंदे भारत ही सध्या तरी सर्वात तेज ट्रेन मानली जाते. या ट्रेनला रस्ता देण्यासाठी म्हणजेच हाय प्रायोरिटी देण्यासाठी बाकीच्या सर्व ट्रेन थांबवल्या जातात. परंतु भारतीय रेल्वेमध्ये आणखीन अशा दोन ट्रेन आहेत ज्यांना हाय प्रायोरिटी प्रदान केली जाते. त्यासाठी वंदे भारत सारख्या ट्रेनला देखील थांबावे लागते.
1) एक्सीडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ARME ट्रेन
भारतीय स्टेशनवर फक्त पॅसेंजरच नाही तर मालवाहतूक ट्रेन देखील सहभागी आहे. बऱ्याचदा राजधानी, शताब्दी, वंदे भारत यांसारख्या ट्रेन जाण्यासाठी बाकीच्या सर्व ट्रेन थांबवल्या जातात. परंतु भारतामध्ये अजून एक अशी ट्रेन आहे जिला हाय प्रायोरिटी देण्यासाठी शताब्दी सारख्या सर्व ट्रेन थांबवल्या जातात. ही ट्रेन म्हणजे एक्सीडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ARME. याला मराठीमध्ये दुर्घटना राहत चिकित्सा उपकरण ट्रेन म्हटले जाते. या ट्रेनचा वापर एखादा ट्रेन अपघात झाल्यावर अपघाताच्या ठिकाणी मेडिकल सहकार्य पोहोचवण्यासाठी केला जातो. या ट्रेनमध्ये सर्व ट्रेन पेक्षा जास्त प्राथमिकता दिली जाते. या ट्रेनच्या पुढे शताब्दी किंवा वंदे भारत राजधानी यासारख्या ट्रेन देखील सुरू असतील तर त्यांना थांबवले जाते आणि एक्सीडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ट्रेन ला जाण्यासाठी रस्ता दिला जातो. ही भारतीय रेल्वेतील सर्वात हाय प्रायोरिटी ट्रेन आहे.
2) प्रेसिडेंट स्पेशल ट्रेन–
त्याचबरोबर दुसरी हाय प्रायोरिटी वाली ट्रेन (Indian Railways) म्हणजे प्रेसिडेंट स्पेशल ट्रेन. या ट्रेनमधून राष्ट्रपती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी प्रवास करतात. जेव्हा ही ट्रेन जाते तेव्हा राजधानी, शताब्दी, वंदे भारत यासारख्या सर्व ट्रेन थांबवल्या जातात. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद कानपूर येथील गृह नगर मध्ये जाण्यासाठी याच ट्रेनचा वापर करत होते. सध्याच्या काळात राष्ट्रपती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर करतात. त्यामुळे जास्त करून ही ट्रेन आता ट्रॅक वर शक्यतो कधी दिसत नाही.