टाइम्स मराठी । एखाद्या लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास म्हणून भारतीय रेल्वे कडे (Indian Railways) पाहिले जाते. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना कोणत्या अडचणी येऊ नये आणि सर्व सुख सुविधा मिळाव्या यासाठी काळजी घेतली जाते. तसेच रेल्वे कडून वेगवेगळे नियम देखील बदलले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी मदुराई स्थानकासमोर उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागल्यामुळे रेल्वे विभाग खडबडून जागा झाला असून सर्वच प्रवासी गाड्यांमध्ये आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्याच्या सूचना रेल्वेने दिले आहेत.
कोणकोणती उपकरणे बसवणार? (Indian Railways)
मदुराई स्टेशनसमोर उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागल्यामुळे उत्तर प्रदेश येथून तीर्थयात्रेसाठी गेलेल्या नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रेल्वे विभाग सावध झाला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एसी कोच, पॅंट्री कार आणि पॉवर कारमध्ये फायर स्मोक डिटेक्शन सिस्टीम बसवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एसी नसलेल्या डब्बामध्ये अग्निशमन यंत्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
रेल्वेच्या (Indian Railways) एसी कोच मध्ये येणाऱ्या काळात फायर स्मोक डिटेक्शन सिस्टीम लावल्यानंतर ट्रेनमध्ये आग लागल्यास ही सिस्टीम अलार्म वाजवेल. आणि ही आग वाढण्यापूर्वी विझवता येईल. फायर अँड स्मॉल डिटेक्शन सस्पेन्शन सिस्टीम सोबतच एक्स्पिरेशन टाईप फायर अँड स्मोक डिटेक्शन सेंसर, सप्रेशन आउटलेट, पीएलसी पॅसेंजर अलार्म बजर यासारखे उपकरणे देखील रेल्वेमध्ये लावण्यात येतील. हे सर्व उपकरणे प्रवाशांना सतर्क करतील आणि आग विझवण्यासाठी देखील मदत करतील.
कस काम करणार?
हे उपकरणे धूर, आग यासारख्या घटना रेल्वे मध्ये घडल्यास सिस्टममध्ये असलेले सेंसर वाजेल. हे सेंसर अलार्म वाजल्यानंतर दोन्ही सिलेंडर एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात करतील आणि नायट्रोजन आणि पाण्याचे मिश्रण पाईपंच्या माध्यमातून फवारतील. या दोन्ही सिलेंडरवर प्रेशर पडल्यास वोल्व उघडेल आणि आग नियंत्रणात येईल. रेल्वेमध्ये पर्याय म्हणून पॉवर कार बसवण्यात येत असते. ही पावर कार एक जनरेटर आहे. याच्या माध्यमातून खास परिस्थितीमध्ये रेल्वेच्या डब्यांना वीज पुरवली जाते.