Indian Railways : देशातील ‘या’ रेल्वे स्टेशनवरून धावतात सर्वात जास्त ट्रेन

Indian Railways । लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी सर्वात सोईस्कर प्रवास म्हणून भारतीय रेल्वे कडे पाहिले जाते. दोन किंवा तीन दिवसांचा प्रवास असो किंवा एका दिवसाचा प्रवास असो या प्रवासाला बस पेक्षा रेल्वेला जास्त प्राधान्य दिले जाते. परंतु बऱ्याचदा आपली ट्रेन यायला वेळ लागतो त्यामुळे आपण ट्रेन येण्याची वाट बघत बसतो. परंतु एक असे स्टेशन आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त ट्रेन्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी चारही दिशांमधून ट्रेन मिळतात. तर जाणून घेऊया या स्टेशन बद्दल.

   

1) हावडा रेल्वे स्टेशन (Howrah Railway Station)

मुंबई रेल्वे स्टेशनवर आपण प्रचंड गर्दी पाहत असतो. परंतु सर्वात बिझी स्टेशन म्हणून हावडा जंक्शन रेल्वे स्टेशन कडे बघितलं जाते . हे सर्वात बिझी रेल्वे स्टेशन आहे. हावडा रेल्वे स्टेशन (Indian Railways) वर प्रत्येक दिवशी येणाऱ्या प्रवासाची संख्या प्रचंड असते त्यामुळे हे भारतातील सर्वात बिझी स्टेशन बनले आहे. त्याचबरोबर या स्टेशनवरून दररोज सहा लाख प्रवासी ये -जा करत असतात. त्याचबरोबर या स्टेशनवर 210 ट्रेन प्रत्येक दिवशी 974 वेळा ये- जा करतात. हावडा स्टेशनवर तब्बल 23 प्लॅटफॉर्म आहेत जे की संपूर्ण भारतीय रेल्वे प्रणालीमध्ये सर्वात जास्त प्लॅटफॉर्म्स आहेत.

2) नवी दिल्ली रेल्वे स्टेशन (New Delhi Railway Station)

सर्वात बिझी स्टेशन पैकी दुसऱ्या नंबरचे स्टेशन म्हणजे नवी दिल्ली स्टेशन. या स्टेशनवर 16 प्लॅटफॉर्म उपलब्ध असून रोज 400 पेक्षा जास्त ट्रेन्स या स्टेशन वरून धावतात. रोज 5, 00,000 प्रवासी या ट्रेनने प्रवास करत असतात. याबरोबर नवी दिल्लीच्या स्टेशनचा जगातील सर्वात मोठा मार्ग इंटरलॉकिंग सिस्टीम चा रेकॉर्ड देखील करण्यात आला आहे.

3) लखनऊ चारबाग रेल्वे स्टेशन (Indian Railways)

1914 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या लखनऊचे चारबाग रेल्वे स्टेशन हे देखील भारतातील सर्वात जास्त व्यस्त आणि प्रवाशांनी भरलेल्या स्टेशनपैकी एक आहे. या स्टेशन वरून 300 पेक्षा जास्त ट्रेन धावतात. चारबाग रेल्वे स्टेशनवर 15 प्लॅटफॉर्म उपलब्ध असून या प्लॅटफॉर्मवरून 3.50 लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. त्याचबरोबर लखनऊ चारबाग रेल्वे स्टेशन हे वास्तुशिल्प कला या साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. याशिवाय भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन म्हणून सुद्धा या रेल्वे स्टेशन कडे बघितलं जाते.