Indian Railways : AC आणि स्लीपर कोचमध्ये झोपण्याच्या नियमात बदल; आता ‘इतका’ तासच झोपता येणार

Indian Railways । भारतीय रेल्वेने प्रवास करत असताना रात्रीच्या वेळी झोपण्याचे काही नियम बदलले आहेत. या नियमानुसार आता प्रवासात झोपण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर आता लांबच्या प्रवासामध्ये तुम्ही फक्त 8 तास झोपू शकतात. प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारीमुळे हा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी 9 तास प्रवाशांना झोपण्याची मुभा होती. परंतु आता प्रवास करत असताना 8 तास प्रवासी झोपू शकतात. तुम्ही सुद्धा रेल्वेने प्रवास करत असालच त्यामुळे ही माहिती तुम्हाला असं आवश्यकच आहे.

   

रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत झोपता येणार – Indian Railways

भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) एसी कोच आणि स्लीपर मध्ये रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 9 तास झोपण्याची वेळ होती. आता हे वेळापत्रक बदलून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. प्रवाशांना चांगली झोप मिळावी यासाठी हा नियम करण्यात आला आहे. बऱ्याचदा काही प्रवासी मिडल बर्थ वर झोपण्यासाठी कधीही बर्थ तयार करतात. परंतु याचा त्रास बर्थ खाली असलेल्या सीट वर बसलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर या नियमाचे पालन केले नाही तर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर नवीन नियमाप्रमाणे रेल्वेमध्ये (Indian Railways) रिझर्व केलेले बसण्याच्या सीटवर प्रवासी रात्री 10 ते 6 या वेळेपूर्वी झोपू शकत नाहीत. झोपण्याच्या नियमानुसार दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत झोपण्याची अनुमती देण्यात आली आहे. रात्री दहा ते सहा या वेळेच्या पूर्वी या सीट चा वापर बसण्यासाठी करण्यात यावा. बऱ्याचदा या सीटवर बसण्यासाठी प्रवाशांमध्ये भांडण होत असतात. त्यामुळे बरेच प्रवासी भारतीय रेल्वे कडे तक्रार करतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या नव्या नियमाच्या अंतर्गत रात्री मोठ्याने बोलणे, आवाज करणे, गाणी ऐकणे सुद्धा प्रवाशांना महागात पडणार आहे.