रेल्वे डब्ब्यावरील X आणि LV चिन्हाचा ‘हा’ आहे अर्थ? तुम्हालाही माहिती असायलाच हवी

टाइम्स मराठी । एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये जाण्यासाठी आपण भारतीय रेल्वेचा प्रवास सोयीस्कर मानतो. कारण रेल्वे प्रवास करत असताना आरामात आम्ही सोयी सुविधांचा लाभ घेऊन आपण प्रवास करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचदा प्रवास करत असताना ट्रेन वर वेगवेगळे symbol बघितले असतील. या सिम्बॉल चा वेगवेगळा अर्थ असतो. आणि या चिन्हाच्या माध्यमातून वेगवेगळे संकेत दिले जातात. त्याच प्रकारे तुम्ही ट्रेनच्या सर्वात शेवटच्या डब्यावर X आणि LV हे चिन्ह बघितले असतील.

   

ट्विटरने लोगो बदलल्यानंतर आता चिमणीच्या ऐवजी X हा लोगो ठेवण्यात आला आहे. अशातच आता भारतीय रेल्वेने लोकांना एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न ट्विटरचा लोगो आणि ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर असलेले चिन्ह यावर आहे. या चिन्हाचा नेमका अर्थ काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. एक फोटो ट्विट करत दक्षिण पश्चिम रेल्वेने म्हटले आहे की, #IndianRailways चा ‘X’ फॅक्टर . रेल्वे डब्यावरील X चिन्हाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

काय आहे X आणि LV चा अर्थ ?

रेल्वे वरील X आणि LV ही चिन्हे प्रवाशांसाठी नाहीत तर रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. X हे चिन्ह ट्रेनचा हा डब्बा शेवटचा कोच असल्याचं दर्शवतो. हे दोन्ही चिन्ह पिवळ्या आणि पांढऱ्या कलर मध्ये दाखवले जातात. या चिन्हांच्या माध्यमातून हे समजण्यासाठी मदत होते की ट्रेनचे संपूर्ण डबे सुव्यवस्थित आहे. त्याच प्रकारे जर हे चिन्ह ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर नसल्यास ट्रेनचे डबे घसरल्याची शक्यता असते. त्यानुसारच स्टेशन मास्टर ट्रेन थांबवून बाकीच्या डब्यांची शहानिशा करतात. ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X सोबतच एका छोट्या बोर्डवर LV सुद्धा लिहिलेले असते. या LV चा अर्थ लास्ट व्हेईकल(Last Vehicle) असा आहे.