टाईम्स मराठी । मित्रानो, तुम्ही आत्तापर्यंत रेल्वेने (Indian Railways) प्रवास कधी ना कधी केलाच असेल. भारतातील प्रवासाचे स्वस्तात मस्त आणि उत्तम साधन म्हणून रेल्वेकडे बघितलं जात. देशात रेलवेच जाळही मोठ्या प्रमाणात विस्तारलं असल्यामुळे कोणत्या राज्यातून कुठेही अगदी आरामात जाता येतं. त्यामुळे अनेकजण रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु रेल्वे प्रवास करत असताना तुम्हाला एक प्रश्न नेहमी पडला असेल तो म्हणजे रेल्वे स्टेशनवरील स्थानकांची नावे पिवळ्या बोर्डावरच का लिहिलेली असतात? इतर कोणत्या रंगात हे बोर्ड का नसतात? चला आज आम्ही तुमचं जनरल नॉलेज वाढवतो.
काय आहे कारण – (Indian Railways)
भारतीय रेल्वे सारखी (Indian Railways) संस्था आपले सर्व बोर्ड पिवळ्या रंगात ठेवते याचा अर्थ नक्कीच त्यामागे मोठंच काहीतरी कारण असणार.. खरं बघितलं तर दिवस असो वा रात्र, पिवळा रंग हा कायमच उठून दिसतो. त्यातही जर पिवळ्या बोर्डवर काळ्या अक्षरता काही लिहिले तर ते अगदी लांबूनही सहज आणि आरामात दिसत. हेच मुख्य कारण आहे कि, भारतीय रेल्वे आपल्या सर्व स्थानकांवर पिवळ्या बोर्डावर नावे टाकत असते.
दुसरं एक मुख्य कारण म्हणजे ऊन असो, पाऊस असो किंवा धुके असो काहीही असो, पिवळा रंग सहज ओळखता येतो. रिमझिम पावसात सुद्धा पिवळ्या रंगावर सहज दिसून येतो. याशिवाय, प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रंगाचा बोर्ड लोको पायलटला लांबूनच दिसतो आणि त्यानुसार तो ट्रेनचा (Indian Railways) वेग ठरवतो त्यामुळे सुद्धा पिवळा रंग फायदेशीर ठरतो.