Indus App Store : आपल्या स्मार्टफोन मध्ये एखादे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपण Google Play Store चा वापर करतो. या Google Play Store च्या माध्यमातून विश्वासार्हतेने एप्लीकेशन डाऊनलोड केले जातात. अँड्रॉइड युजर साठी Google Play Store हे विश्वासनीय स्टोर आहे. परंतु आता गुगल प्ले स्टोअरची मक्तेदारी संपुष्टात येणार असून आता ग्राहकांना नवीनॲप स्टोअर मिळेल. कारण आता लवकरच लवकरच Phonepe ने नवीन अँप स्टोर लॉंच करण्याची घोषणा केली आहे.
Google Play Store च्या माध्यमातून अँड्रॉइड युजर्स एप्लीकेशन डाउनलोड करत असतात. परंतु आता भारतीय युजरसाठी नवीन ॲप स्टोअर लॉन्च करण्यात येणार आहे. Google Play Store बाबत आलेल्या तक्रारींचा फायदा उठवत Phonepe ने नवीन ॲप स्टोअर आणण्याची घोषणा केली आहे. या नवीन ॲप स्टोअर चे नाव Indus असेल. Indus App Store हे Google Play Store ला टक्कर देणार आहे. त्यानुसार लवकरच हे ॲप अँड्रॉइड युजर साठी लॉन्च करण्यात येईल.
12 भारतीय भाषांना करेल सपोर्ट- Indus App Store
Google Play Store वरून ज्या प्रकारे वेगवेगळे ॲप डाऊनलोड करण्याची परवानगी होती त्याचप्रमाणे Indus अँप स्टोअर वरून देखील ॲप डाऊनलोड करता येतील. Phonepe च्या या नवीन Indus App Store बद्दल सांगायचं तर, या एप्लीकेशन मधील सर्व ॲप्स लिस्ट एक वर्षासाठी पूर्णपणे विनामूल्य असेल. हे ॲप 12 भारतीय भाषांना सपोर्ट करेल. जेणेकरून वेगवेगळ्या ॲप कंपन्यांना आणि युजर्स ला त्याचा फायदा होईल.
युजर्स घेऊ शकतात गेमिंगचा फायदा
Indus App Storeवर सध्या गेमिंग चे वेगवेगळे एप्लीकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. हे ॲप्स यूजर्स आरामात डाऊनलोड करून गेमिंग चा आनंद घेऊ शकतात. या ॲप स्टोअरच्या माध्यमातून डेव्हलपर्स कडून कमी फी वसूल केली जात असल्याचे गुगलने सांगितलं.