Infinix Inbook X3 Slim लॅपटॉप लॉन्च; 25 ऑगस्टपासून विक्री सुरु

टाइम्स मराठी | Infinix कंपनीने भारतामध्ये नवीन लॅपटॉप (Infinix Inbook X3 Slim) लॉन्च केला आहे. या लॅपटॉप चे नाव Inbook X3 Slim असून हा लॅपटॉप तीन स्टोरेज वेरीएंट मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हा नवा लॅपटॉप तुम्हाला रेड ग्रीन, ग्रे आणि ब्ल्यू कलर मध्ये उपलब्ध असून प्रत्येक वेरियंटची किंमत वेगवेगळी आहे. आज आपल्या लॅपटॉप रिविव्ह मध्ये या लॅपटॉपचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

   

फिचर्स- (Infinix Inbook X3 Slim)

Inbook X3 Slim या लॅपटॉप मध्ये ॲल्युमिनियम अलॉय फिनिशिंग देण्यात आलेले आहे. यामध्ये 12th जनरेशन इंटल कोर i7 प्रोसेसर मिळतो. यासोबतच iris Xe ग्राफिक्स यामध्ये देण्यात आले आहे. या लॅपटॉपचे वजन 1.24 kg आणि थिकनेस 14.8 mm एवढी आहे. अतिशय स्लिम असलेला हा लॅपटॉप तरुणांना चांगलाच आकर्षित करेल. Inbook X3 Slim लॅपटॉप मध्ये 14.1 इंच डिस्प्ले देण्यात आलेला असून हा डिस्प्ले फुल एचडी रेसोल्युशन सह उपलब्ध आहे. यासोबतच या डिस्प्लेला 300नीट ब्राईटनेस देण्यात आलेला आहे. हा लॅपटॉप विंडो 10 होम सह उपलब्ध करण्यात आला आहे. या लॅपटॉप मध्ये 50 Wh बॅटरी उपलब्ध असून ही बॅटरी 65PD 3.0 टाईपची फास्ट चार्जर ने चार्ज करता येते. कंपनीचा दावा आहे की या लॅपटॉप ची बॅटरी 55 मिनिटांत 60 टक्के चार्ज होते.

कनेक्टिव्हिटी-

Inbook X3 Slim लॅपटॉप मध्ये (Infinix Inbook X3 Slim) कनेक्टिव्हिटी साठी 3.5mmहेडफोन जॅक, 720 पिक्सल एचडी वेबकॅम, दोन डिजिटल मायक्रोफोन देण्यात आले आहे. यासोबतच लॅपटॉप मध्ये स्टिरिओ स्पीकर देखील देण्यात आलेले आहे. यासोबतच वायफाय 6802.11 AX, ब्लूटूथ 5.1, चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर साठी यूएसबी टाइप सी पोर्ट, HDML 1.4 पोर्ट आणि एसडी कार्ड स्लॉट यासारखे फीचर्स सुद्धा उपलब्ध आहेत.

किंमत-

Inbook X3 Slim हा लॅपटॉप तीन स्टोरेज वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. यातील 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज वेरियंटवाल्या core i3 प्रोसेसर मॉडेलची किंमत भारतात 33,999 रुपये एवढी आहे. तर 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज वेरियंट च्या Core i5 मॉडेलची किंमत 39,490 रुपये एवढी आहे. याशिवाय या लॅपटॉपच्या टॉप एन्ड वेरियंटची Core i7 प्रोसेसर मॉडेल ची किंमत 49,990 रुपये एवढी आहे.हा टॉप व्हेरिएंट 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. येत्या 25 ऑगस्ट पासून Infinix Inbook X3 Slim हा विक्रीसाठी खुला करण्यात येणार आहे. जर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून 25 ऑगस्ट पासून खरेदी करू शकतात.