Infinix INBook Y2 Plus : Infinix ने लाँच केला स्वस्तात मस्त Laptop; मिळतात दमदार फीचर्स

Infinix INBook Y2 Plus : मित्रानो, लॅपटॉप हा आजकाल अनेक कामांसाठी गरजेचा झाला आहे. परंतु किमती महाग असल्याने अनेकजण इच्छा असूनही लॅपटॉप खरेदी करू शकता नाहीत. भारतीय बाजारपेठेत Asus, Samsung, Dell, HP, Infinix, Jio या कंपन्यांचे लॅपटॉप प्रसिद्ध आहेत. परंतु ग्राहक मात्र स्वस्तात लॅपटॉप खरेदी करण्याला आपले पप्राधान्य देत असतो. हीच गोष्ट नजरेसमोर ठेऊन प्रसिद्ध ब्रँड Infinix ने ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असा लॅपटॉप बाजारात आणला आहे. Infinix INBook Y2 Plus असे या लॅपटॉपची नाव असून यामध्ये तुम्हाला अनेक दमदार असे फीचर्स मिळतात.

   

15.6 इंचाचा डिस्प्ले –

Infinix INBook Y2 Plus या लॅपटॉप मध्ये 15.6 इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले ची स्क्रीन 260 Nits च्या पीक ब्राइटनेस देते. कंपनीने या लॅपटॉप मध्ये डबल स्पीकर दिले आहेत. तसेच या लॅपटॉप मध्ये Core i3-1115G4 चिप किंवा Core i5-1155G7 चिपचा वापर करण्यात आला आहे. तसेच 11th Gen Intel प्रोसेसर तुम्हाला या लॅपटॉप मध्ये मिळेल.

Infinix INBook Y2 Plus मध्ये 16 GB रॅम आणि 512 GB SSD स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने या लॅपटॉप मध्ये 50Wh बॅटरी दिली असून ही बॅटरी 65W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. या चार्जरच्या मदतीने हा लॅपटॉप 60 मिनिटांत 75% चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. लॅपटॉपच्या कनेक्टिव्हिटी बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये तुम्हाला 2 USB Port, 2 USB A Port, आणि HDMI पोर्ट मिळेल.

किंमत किती ? Infinix INBook Y2 Plus

या लॅपटॉपच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Infinix INBook Y2 Plus मधील 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट लॅपटॉपची किंमत 27,490 पासून सुरू होते तर 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,990 रुपये आहे. तुम्ही हा लॅपटॉप ब्लू, सिल्व्हर आणि ग्रे रंगांमध्ये खरेदी करू शकता.