Infinix Smart 8 HD स्मार्टफोन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | Infinix कंपनीने भारतात बजेट सेगमेंट मध्ये नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या मोबाईल मध्ये डायनामिक आयलँड सारखी डायनॅमिक नॉच फीचर मॅजिक रिंग देण्यात येईल. यासोबतच या स्मार्टफोनच्या कॅमेरा मध्ये फोटोग्राफीसाठी AI लेन्स देखील मिळेल. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव, Infinix Smart 8 HD आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फक्त 5669 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. त्यामुळे हा मोबाईल बजेट सेगमेंट मध्ये उपलब्ध असलेल्या मोबाईल सोबत प्रतिस्पर्धा करणार आहे. तुम्ही देखील हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रिस्टल ग्रीन, शायनी गोल्ड, टिंबर ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतात. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

 स्पेसिफिकेशन

 Infinix Smart 8 HD मध्ये 6.6 इंच HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Unisoc T606 प्रोसेसर दिला असून मोबाईल मध्ये तुम्हाला 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आले आहे.  तसेच या मोबाईल चे इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड च्या मदतीने वाढवता येऊ शकते.

कॅमेरा– Infinix Smart 8 HD

मोबाईल च्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यासोबतच LED लाईट देखील या कॅमेरासह उपलब्ध आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 MP, सेकंडरी कॅमेरा हा AI लेन्स असेल. यासोबतच सेल्फी साठी 8 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपसह  पोट्रेट आणि नाईट मोड मिळतो.

कनेक्टिव्हिटी फिचर्स

Infinix Smart 8 HD मध्ये  5000 mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाईल मध्ये वाय-फाय , GPS, USB TYPE C PORT, ब्लूटूथ यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. याशिवाय ऑडिओ जॅक, पॉवरफुल स्पीकर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा देखील देण्यात आली आहे. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, 13 डिसेंबर रोजी  फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता.