Infinix Smart 8 : बाजारात आलाय खिशाला परवडणारा मोबाईल; किंमत 8500 रुपयांपेक्षा कमी

टाइम्स मराठी । इनफिनिक्स कंपनीने नायजेरियाई बाजारपेठेमध्ये नवीन बजेट फ्रेंडली मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Infinix Smart 8 आहे. हा या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने SMART 7 लॉन्च केला होता. आता लॉन्च करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन TECNO POP 8 प्रमाणे दिसतो. कंपनीने Infinix Smart 8 हा चार कलर ऑप्शन मध्ये लाँच केला आहे. या मोबाईलची किंमत 82000 NGA म्हणजेच भारतीय चलनानुसार 8,500 रुपये आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये खरेदीसाठी देखील उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले असून जाणून घेऊया या  स्मार्टफोनची स्पेशालिटी.

   

स्पेसिफिकेशन

Infinix Smart 8 या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  HD रिझोल्युशन, 90 HZ रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय हा डिस्प्ले  550 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये युनिसोक T606 प्रोसेसर देण्यात आला असून हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन  XOS 13 वर बेस्ड असून अँड्रॉइड 13 वर काम करतो.

कॅमेरा– Infinix Smart 8

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Infinix Smart 8 मध्ये  ग्रेडियंट बॅग पॅनल देण्यात आले असून या पॅनलवर चौरस कॅमेरा मॉड्युल उपलब्ध आहे. त्याचबरोबर पंच होल कॅमेरा कट आउट देखील या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आले आहे. यामध्ये कंपनीने  VGA डेप्थ सेंसर आणि LED फ्लॅश सह  13 MP सेंसर दिले आहे. या मोबाईलच्या सेल्फी कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

स्टोरेज

Infinix Smart 8 मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हे इंटरनल स्टोरेज मायक्रो SD कार्ड च्या माध्यमातून वाढवता येऊ शकते. याशिवाय स्टोरेज मध्ये देण्यात आलेली 8 GB रॅम ही 4 GB व्हर्च्युअल आणि 4 GB स्टॅंडर्ड रॅम आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये कंपनीने 5000 MAH बॅटरी दिली असून ही बॅटरी 10 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये USB C पोर्ट मिळते.

कलर

या स्मार्टफोन मध्ये कंपनीने टिंबर ब्लॅक, गॅलेक्सी व्हाईट, क्रिस्टल ग्रीन आणि शायनी गोल्ड कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. तसेच  एप्पल सारखा डायनामिक आयलँड प्रमाणे चार्जिंग आणि स्टेटस अपडेट देण्यात आले आहे. या मोबाईलच्या पावर बटन मध्ये साईड माउंटेन फिंगरप्रिंट स्कॅनर वापरण्यात आले आहे.