Infinix Smart 8 : फक्त 7000 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम वाला मोबाईल

टाइम्स मराठी । नव्या वर्षात मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. प्रसिद्ध मोबाईल कंपनी Infinix ने ग्राहकांना परवडेल अशा किमतीत दमदार असा मोबाईल लाँच केला आहे. Infinix Smart 8 असे या मोबाईलचे नाव असून आज म्हणजेच 15 जानेवारीपासून हा मोबाईल विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये तब्बल 8GB रॅम मिळत असून तुम्ही अवघ्या 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हा मोबाईल खरेदी करू शकता. चला आज आपण जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे खास फीचर्स …..

   

6.6-इंचाचा IPL LCD डिस्प्ले-

Infinix Smart 8 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा IPL LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले ला HD Plus रिझोल्यूशन मिळते. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर Helio G36 SoC चिपसेट बसवली असून हा मोबाईल Android 13 आधारित OS वर चालतो. पॉवरसाठी यामध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. Infinix Smart 8 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची सुविधा आहे. मात्र, एक्सटर्नल मेमरी कार्डच्या सपोर्टने या फोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच यामध्ये 4GB वर्चुअल रॅम दिली आहे. म्हणजेच तुम्ही एकूण 8GB रॅम वापरू शकता.

कॅमेरा – Infinix Smart 8

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास Infinix Smart 8 मध्ये, 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये ऑल सिम कार्ड स्लॉट, 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, Bluetooth v5.0, GPS, USB Type-C पोर्ट यासह अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत.

किंमत किती ?

कंपनीने Infinix Smart 8 अवघ्या 7,499 रुपये किमतीत लॉन्च केला आहे. फ्लिपकार्टवर आजपासून या मोबाईलची विक्री सुरु झाली असून हा तुम्ही स्मार्टफोन पांढरा, निळा, सोनेरी आणि काळ्या रंगात बाजारात आणला आहे.