Instagram वर येणार नवं फीचर्स; आता ग्रुपमध्ये मिळणार स्टोरी शेअरिंगचा पर्याय

टाइम्स मराठी । मेटा नेहमीच Facebook, Whatsapp आणि Instagram वर सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असत आणि यूजर्सना नवं काहीतरी देत असत. काही दिवसांपूर्वी मेटाने फेसबुक आणि व्हाट्सअप मध्ये काही बदल केले होते. आता इंस्टाग्राम मध्ये सुद्धा नवे फीचर्स ऍड करून यूजर्सचा आनंद द्विगुणित होणार आहे. मेटा इंस्टाग्रामवर एक नवं फीचर्स घेऊन येणार आहे त्यामाध्यमातून एकाच वेळी अनेक जणांना स्टोरी शेअर करण्याचा पर्याय मिळू शकतो.

   

Instagram वर लॉन्च करण्यात येणाऱ्या या नवीन फीचरच्या माध्यमातून युजर्सला एकाच वेळी बऱ्याच लोकांना स्टोरी शेअर करण्याचे ऑप्शन मिळू शकते. एवढेच नाही तर या नवीन फीचर च्या माध्यमातून एक ग्रुप देखील बनवता येणार आहे. या ग्रुप मध्ये तुम्ही स्टोरी शेअर करू शकाल. सध्या या फीचर वर काम सुरू असून लवकरच युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करण्यात येणार आहे.

Instagram चे प्रमुख एडम मॉसेरी यांनी या नवीन फीचर्स बद्दल घोषणा केली आहे. ते म्हणाले की, या नवीन फीचर च्या माध्यमातून तुम्ही स्टोरी छोट्या ग्रुप मध्ये शेअर करू शकाल . त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम परवानगी देईल. यासोबतच तुमची स्टोरी कोण पाहत आहे यावर सर्वात जास्त लक्ष दिले जाईल. त्यानुसार जेव्हा तुम्ही स्टोरी पब्लिश कराल किंवा शेअरऑप्शन निवडाल. तेव्हा तुम्हाला बरेच ऑप्शन उपलब्ध होतील. त्यानुसार तुम्ही क्लोज फ्रेंड आणि बाकी दुसऱ्या फ्रेंड लिस्ट ऑप्शन असलेला मेनू खाली दिसेल. या ड्रॉप डाऊन मेनूच्या माध्यमातून तुम्ही लिस्ट बनवू शकता.

दरम्यान, तरुणाईमध्ये फेसबुक पेक्षा Instagram वर जास्त आकर्षण आहे. तसेच अनेक स्टार क्रिकेटपटू, जगभरातील महत्वाच्या व्यक्ती. सेलिब्रेटी सुद्धा इंस्टाग्रामवर सातत्याने नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. त्यामुळे व्हाट्सअँप प्रमाणेच इंस्टाग्रामचा वापर सुद्धा वाढलेला आहे. आता इंस्टाग्राम सुद्धा नवनवीन फीचर्स ऍड करत असल्याने त्याचा वापर करणं आणखी मजेशीर होणार आहे.