Instagram Reels : आता Internet शिवाय पाहता येणार Instagram Reels

Instagram Reels । Instagram चा वापर न करणाऱ्या युजरची संख्या हातावर मोजण्या इतकी असेल. कारण इंस्टाग्राम चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रत्येकाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. META कंपनीने इंस्टाग्राम मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट केल्यापासून आणि इंस्टाग्राम मध्ये रील्स हे फीचर उपलब्ध करण्यात आल्यामुळे इंस्टाग्राम यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम वर रिल्स पाहत असाल. परंतु रिल्स पाहत असताना  मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर होतो. पण विना इंटरनेट तुम्हाला इंस्टाग्राम वर उपलब्ध असलेल्या रील्स पाहता आल्या तर? होय हे होऊ शकतं. ते कसं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

   

काय आहे हे फीचर

Instagram वर उपलब्ध असलेल्या रील्सच्या माध्यमातून युजर्स  शॉर्ट बट स्वीट क्लिप बनवतात. या क्लिपमध्ये एखाद्या गाण्यावर डान्स केलेला किंवा एक्टिंग केलेला व्हिडिओ असतो. ही क्लिप म्हणजेच रिल्स शेअर आणि पोस्ट केल्यानंतर फॉलोवर्सला दिसते. ऑफिशियल अकाउंट मध्ये  या रिल्स कोणीही पाहू शकतं. परंतु यासाठी इंटरनेट असणे गरजेचे आहे. आता  instagram रील्स साठी एक इनोव्हेटिव्ह ऑफलाइन मोड वर काम सुरू आहे. म्हणजेच आता  इनोव्हेटिव्ह ऑफलाइन मोड च्या माध्यमातून इंटरनेट शिवाय युजर्स Instagram Reels पाहू शकतील.

अशा पद्धतीने करेल काम – Instagram Reels

या इनोव्हेटिव्ह ऑफलाइन मोडच्या माध्यमातून युजर्स इंटरनेट एक्सेस असल्यावर रिल्स प्री डाऊनलोड करू शकतात. या Instagram Reels डाउनलोड झाल्यानंतर युजर्स रिल्स ऑफलाइन पद्धतीने बघू शकतात. त्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज लागणार नाही. ही सुविधा युजर्स ला इंस्टाग्राम  सामग्री सोबत संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.  यापूर्वी कंपनीने हे फीचर US मध्ये उपलब्ध केले होते. आता कंपनीने हे फीचर ग्लोबली उपलब्ध केले आहे.

या ठिकाणी उपयुक्त आहे हे फीचर 

इनोव्हेटिव्ह ऑफलाइन मोड फीचर हे ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही अशा ठिकाणी उपयुक्त आहे. ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी चा प्रश्न निर्माण होतो, त्या ठिकाणी सोशल मीडिया युजर्स ला  रील्स प्री डाउनलोड करून ठेवता येऊ शकतात. विना इंटरनेट कनेक्शन इंस्टाग्राम रिल्स पाहण्यासाठी यूजर्सला इंस्टाग्राम अपडेट करावे लागेल.