Intel ने लाँच केला नवा Processors; AI सपोर्टने असणार सुसज्ज

टाइम्स मराठी । आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येत आहे. आयटी कंपन्या, गुगल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, एप्लीकेशन यासोबतच चीपसेट मध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा सपोर्ट देण्यात येत आहे. यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजंट मोठ्या चर्चेत असून या आर्टिफिशल इंटेलिजंट च्या माध्यमातून बरेच प्रोडक्ट आणि सर्विसेस सुरू करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी क्वालकॉम कंपनीने नवीन AI सपोर्ट असलेले चीप सेट लॉन्च केली होती. त्यानुसार आता इंटेल कंपनीने देखील AI एव्हरीव्हेअर इव्हेंट मध्ये इंटेल कोर मोबाईल अल्ट्रा प्रोसेसर लॉन्च केले आहे. या प्रोसेसर च्या माध्यमातून लॅपटॉप वापरण्याचा अनुभव बदलेल.

   

Intel कंपनीने सांगितलं की, इंटेल कोर मोबाईल अल्ट्रा प्रोसेसर हे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हे प्रोसेसर सुरुवातीला 230 कम्प्युटर मध्ये हे प्रोसेसर सुसज्ज करण्यात येणार आहे. हे Acer, ASUS, Dell, Dyna book, gigabyte , Google यासारख्या प्रमुख ओईएम च्या माध्यमातून डेव्हलप करण्यात येणार आहे. आणि क्रोम बुक, HP, लेनोवो, LG , मायक्रोसॉफ्ट सरफेस, MSI आणि सॅमसंग यासारख्या डिवाइस मध्ये इन्स्टॉल करण्यात येईल.

इंटेल कोर मोबाईल अल्ट्रा प्रोसेसर मध्ये न्युरल प्रोसेसिंग युनिट  NPU देण्यात आले आहे. हे युनिट ऑन डिव्हाइस जनरेटर ए आय अनुभव देण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर यामध्ये त्री क्लस्टर CPU देण्यात आला आहे. ज्यामुळे P कार्यक्षमता कोर आणि E कार्यक्षमता कोर आणि LPE लो पॉवर कार्यक्षमता कोर, 8 Xe कोरसह एक एकीकृत आर्क GPU देखील यामध्ये मिळते. इंटेल कोर मोबाईल अल्ट्रा प्रोसेसर हे Snapdragon 8 CX Gen 3, Apple Silicon M3 या प्रोसेसर च्या तुलनेत 11 टक्क्यांपर्यंत  जलद आणि मल्टी थ्रेडेड कार्यप्रदर्शन देते.

2028 पर्यंत AI PC चा पीसी मार्केट मध्ये 80% वाटा असेल.  सध्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर भागधारकांच्या इकोसिस्टीम सह इंटेल डिलिव्हरी करण्यासाठी चांगल्या स्थितीमध्ये आहे. असं इंटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि क्लाइंट कम्प्युटिंग ग्रुपचे महाव्यवस्थापक मिशेल जॉन्सटन यांनी सांगितलं.