iPhone 13 आता खरेदी करा फक्त 6 हजार रुपयात; Flipkart ने आणली ‘ही’ खास ऑफर

टाइम्स मराठी | सध्या ऍपलच्या आयफोनची तरुणांमध्ये जास्त क्रेझ दिसून येत आहे. दहा पैकी पाच व्यक्तीकडे तर नक्कीच आयफोन असतो. परंतु या आयफोनच्या किमती परवडत नसल्यामुळे अनेकांना इच्छा असताना देखील आयफोन खरेदी करता येत नाही. परंतु आता आपल्याला ही इच्छा पूर्ण करता येणार आहे. कारण , फ्लिपकार्टवर सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला iPhone 13 फक्त 6 हजार रुपयात उपलब्ध करून दिला जात आहे. 79 हजारांपर्यंत विकला जाणारा आयफोन आता फ्लिपकार्टवर फक्त सहा हजारांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

   

काय आहे ऑफर? iPhone 13

2019 साली आयफोन 79,900 किमतीत लॉन्च करण्यात आला होता. परंतु आता या फोनची क्रेझ बघता 59,999 च्या डिस्काउंटसह आपल्याला हा आयफोन 6,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. आयफोन 13 फ्लिपकार्ट वर 10,901 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 58,999 रुपयांना लिस्टेड आहे. यासोबतच फ्लिपकार्टवरून आपण हा फोन खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिटच्या EMI व्यवहारांवर केले तर आपल्याला त्यावर 2 हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे आपल्याला हा फोन 56,999 रुपयांनाच मिळत आहे.

जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात iPhone 13

इतकेच नव्हे तर, आपण जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात iPhone 13 खरेदी करायला गेलो तर फ्लिपकार्ट आपल्याला त्यावर देखील 50 हजारांचा डिस्काउंट देत आहे. ज्यामुळे आपण सहा हजारात फोन खरेदी करू शकतो. या सर्व ऑफर्सचा नीट विचार केला तर आपल्याला 79,900 रुपयांचा आयफोन फक्त सहा हजार रुपयात खरेदी करता येत आहे. फक्त यासाठी आपल्याला त्वरित या ऑफरचा फायदा घेणे गरजेचे आहे. जर कोणाला आयफोन 13 खरेदी करायचा असेल तर ते नक्कीच या ऑफरचा विचार करू शकतात.

iPhone 13 फीचर्स

सध्या बाजारात iPhone 13 सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे. येत्या 12 सप्टेंबर रोजी आयफोन 15 देखील लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे आयफोन 13 वर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येत आहेत. आयफोन 13 मध्ये आपल्याला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळत आहे. तसेच या फोनला A15 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, 13 मध्ये 4 के डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह 12 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आयफोन 13 मध्ये ऊपलब्ध आहे. आजही इतर कंपन्या आयफोन 13 चे फिचर्स कॉपी करत आहेत. बाजारात किती नवीन फोन आले असले तरी आयफोन 13 क्रेझ कायम आहे.