iPhone 14 Pro Max वर मिळत आहे बंपर डिस्काउंट; फक्त इतक्या किमतीत करा खरेदी

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून Amazon ओळखलं जाते. आपल्या ग्राहकांना कमीत कमी पैशात वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी Amazon सतत नवनवीन सेल घेऊन येत असत. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या सणासुदीच्या तोंडावर उद्यापासून Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये जवळपास २५ हजार वस्तू तुम्हीं स्वस्तात खरेदी करू शकाल. Amazon Great Indian Festival Sale मध्ये iphone 14वर बम्पर डिस्काउंट देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी कमी किमतीत हा मोबाईल खरेदी करू शकता. ही ऑफर नेमकी काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

   

काय आहे iPhone 14 Pro Max वर ऑफर

iPhone 14 Pro Max हा स्मार्टफोन 139900 रुपयांच्या किमतीत भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आला होता परंतु या मॉडेलवर ९ टक्के सूट देण्यात येत आहे.  त्यानुसार हा स्मार्टफोन तुम्ही 1,27,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. . परंतु आता या स्मार्टफोनवर वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर अमेझॉन वर या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. Amazon वर देण्यात आलेल्या या एक्सचेंज ऑफरनुसार तुम्ही 37500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. यासाठी  एक्सचेंज मॉडेल हे चांगल्या स्थितीत आणि  व्यवस्थित असणे गरजेचे आहे.

स्पेसिफिकेशन

iPhone 14 Pro Max या स्मार्टफोनमध्ये  6.7 इंच चा सुपर रेटिना XDR ऑलवेज ऑन डिस्प्ले  देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  2796×1290 पिक्सल रिझोल्युशन देतो. या स्मार्टफोनमध्ये  A16 Bionic चीपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 6 core CPU वर काम करतो.  iPhone 14 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल, सेकंडरी अल्ट्रावाइड कॅमेरा 12 मेगापिक्सल,  आणि टेलीफोटो कॅमेरा 12 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. यासोबतच सेल्फीसाठी समोरील बाजूला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.