iPhone 14 फक्त 24,399 मध्ये खरेदी करण्याची संधी; पहा छप्पर फाड ऑफर

टाइम्स मराठी । अँपल कंपनीचा आयफोन घेण्याकडे तरुण -तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता लवकरच आयफोन 15 लॉन्च करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारतीय मार्केटमध्ये आलेला आयफोन 14 हा डिस्काउंट ऑफर मध्ये मिळत आहे. जर तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तर अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. याचे कारण म्हणजे तुम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून अवघ्या 24,399 रुपयात iPhone 14 खरेदी करू शकता. ही ऑफर नेमकी काय आहे हेच आपण आज जाणून घेऊयात…….

   

फ्लिपकार्ट वर iPhone 14 या स्मार्टफोनच्या 128 GB वेरियंटची किंमत 79,900 रुपये असून यामध्ये काही डिस्काउंट देण्यात आला असून तो 69,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला सुरुवातीलाच 9,901 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही एक्सचेंज ऑफरनुसार खरेदी करू इच्छित असाल तर त्यासाठी देखील वेगवेगळ्या ऑफर्स यामध्ये उपलब्ध आहे. यासोबतच बँक ऑफर देखील देण्यात आलेल्या आहेत.

बँक ऑफर्स नुसार फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या सेलमध्ये कॅशबॅक मिळण्याचा देखील चान्स आहे. जर तुम्ही आयफोन 14 हा ॲक्सिस बँकेच्या कार्ड वरून घेत असाल तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून तुम्ही हा आयफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला 4000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. एवढेच नाही तर एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्ड वरून तुम्ही EMI वर हा आयफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल.

सर्वात जास्त लाभ तुम्हाला एक्सचेंज ऑफरवर मिळू शकतो. या ऑफरमध्ये तुम्ही 38,600 रुपयांच्या डिस्काउंटवर हा आयफोन खरेदी करू शकतात. परंतु त्यासाठी सिलेक्टेड मॉडेल आणि या जुन्या मोबाईलची अवस्था चांगली असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला 41,600 रुपयांची सूट मिळू शकते. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरवर पूर्ण फायदा घेत असाल तर एचडीएफसी कार्ड वापरल्यावर तुम्हाला 4000 रुपयांनी आणखीन सूट मिळू शकते. म्हणजे तुम्ही फक्त 24,399 मध्ये हा iPhone 14 घरी आणू शकता.