iPhone 15 Launch Date : या दिवशी लाँच होणार iPhone 15 सिरीज; काय फीचर्स मिळणार?

iPhone 15 Launch Date । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता लवकरच iPhone 15 लॉन्च करण्यात येणार आहे. हा आयफोन 12 सप्टेंबरला रात्री 10.30 मिनिटांनी लॉन्च करण्यात येणार आहे. iPhone 15 मध्ये यावर्षी वेगवेगळे अपग्रेड मिळू शकतात. यासोबतच iphone 15 pro मॉडेलच्या किमती देखील जास्त असण्याची शक्यता आहे.

   

iPhone 15 मध्ये काय बदल असतील? iPhone 15 Launch Date

iPhone 15 मध्ये बरेच बदल बघायला मिळू शकतात. यासोबतच सर्व आयफोनच्या मॉडेल्स वर USB टाईप C चार्जर देखील कंपनीकडून देण्यात येऊ शकते. यापूर्वी चार्जिंग साठी कंपनीचा प्रोपर्टी चार्जर वापरण्यात येत होता. परंतु आता कोणत्याही अँड्रॉइड चार्जरने मोबाईल चार्ज करता येऊ शकतो. याशिवाय A17 बायोनिक चिप, स्टॅंडर्ड मॉडल मध्ये A16 बायोनिक चिप आणि डायनामिक आयलँड देखील या आयफोन मध्ये मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच कंपनीने ठेवलेल्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये आयफोन सोबतच नेक्स्ट जनरेशन स्मार्टवॉचचे सुद्धा लॉन्चिंग करण्यात येऊ शकते.

iPhone 15 यासह iphone 15pro होऊ शकतो लॉन्च

iPhone 15 च्या सर्व सिरीज आणि मॉडेल्समध्ये डायनामिक आयलँड फीचर्स देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच अलर्ट स्लाईडर ऐवजी एक बटन देण्यात येऊ शकते. यासोबतच या लॉन्चिंग इव्हेंट मध्ये iPhone 15, iPhone plus, iPhone 15pro, iPhone 15 pro max हे देखील लॉन्च करण्यात येणार आहे. या इव्हेंट कंपनीने वेबसाईटवर माहिती दिली आहे. हा इव्हेंट कंपनीच्या हेड क्वार्टर एप्पल पार्क वरून लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार असून युट्युब वर देखील पाहता येऊ शकतो.

iphone 15 मध्ये देण्यात येईल नवीन कॅमेरा सेटअप आणि नवीन प्रोसेसर

iphone 15 यामध्ये नवीन कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. या सोबतच प्रोसेसर देखील नवीन देण्यात येईल. एवढेच नाही तर यात नवीन सॉफ्टवेअर देखील येऊ शकते. iphone 15 लॉन्च केल्यानंतर airpods pro यासह यूएसबी चार्जिंग केस देखील लॉन्च करण्यात येऊ शकते.