IPhone 15 Pro आणि IPhone 15 Pro Max लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Apple ने मेगा इव्हेंटमध्ये IPhone 15 सिरीज अंतर्गत IPhone 15 प्रो आणि IPhone 15 प्रो मॅक्स हे दोन्ही फोन लॉन्च केले आहे. कंपनीने IPhone 15 प्रो मॅक्समध्ये लॉंग लास्टिंग बॅटरी असल्याचं सांगितलं आहे. IPhone 15 pro आणि IPhone 15 pro Max दोन्ही स्मार्टफोनमध्ये 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. सध्या दोन्ही मोबाईलची प्री बुकिंग सुरू असून 22 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. आज आपण या दोन्ही मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

iphone 15 pro super Retina XDR + OLED डिस्प्ले

IPhone 15 pro मध्ये 6.1 इंचचा super Retina XDR + OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2556×1179 पिक्सेल रिझोल्युशन देतो. कंपनीने हा डिस्प्ले कर्व्ह कॉर्नरमध्ये लॉन्च केला आहे. IPhone 15 pro मध्ये 3nm प्रोसेस वर तयार करण्यात आलेला A17 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे.

IPhone 15 pro max Specification

iphone 15 pro max या iphone 15 च्या सिरीज मध्ये super Retina XDR + OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2796 × 1290 पिक्सेल रिझोल्युशन प्रदान करतो. या स्मार्टफोनच्या फोटोज मध्ये राऊंडेड कर्व्ह डिझाईन दिसत आहे. यामध्ये देखील A17 बायोनिक प्रोसेसर देण्यात आले आहे.

IPhone 15 Pro and iPhone 15 Pro Max Camera

IPhone 15 pro मध्ये प्रायमरी कॅमेरा 48 MP, सेकंडरी कॅमेरा 12 MP चा देण्यात आला आहे. यासोबतच 12 MP टेलीफोटो लेंस सोबत 3x झूम देखील उपलब्ध आहे. तर दुसरीकडे IPhone 15 pro max यामध्ये 48 MP प्रायमरी कॅमेरा, 12 MP पेरिस्कोप कॅमेरा आणि समोरील बाजूला 12 MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या सेकंडरी कॅमेरा सोबत f/2.8 अपर्चर आणि 5x झूम देण्यात आले आहे.

IPhone 15 Pro आणि IPhone 15 Pro Max Speciality

IPhone 15 pro आणि IPhone 15 pro max दोन्ही स्मार्टफोनची बॉडी ही ग्रेड पाच टायटॅनियम आणि ॲल्युमिनियमने बनवण्यात आली आहे. गे टायटॅनियम चा वापर नासाच्या मार्क्स रोवरवर करण्यात आला होता. यासोबतच एप्पल कंपनीने IPhone 15 pro आणि IPhone 15 pro max यामध्ये नवीन ॲक्शन बटन ऍड केले आहे. यापूर्वी आयफोन मध्ये म्यूट बटन देण्यात आले होते. आता हटवण्यात आले आहे. या नवीन आयफोन मध्ये देण्यात आलेले ॲक्शन बटन कस्टमाईज करण्यासाठी आणि आयफोन सायलेंट करण्यासाठी वापर होऊ शकतो.

IPhone 15 pro and IPhone 15 pro max Features

IPhone 15 pro आणि IPhone 15 pro max या दोन्ही स्मार्टफोन मध्ये रेगुलर मॉडेल प्रमाणे यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आले आहे. यासोबतच तुम्ही 10 GBPS च्या स्पीडने डाटा ट्रान्सफर देखील करू शकतात. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी दिवसभर चालते असा कंपनीचा दावा आहे. iphone 15 pro आणि iphone 15 pro max हे दोन्ही मॉडेल ब्लॅक टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम, व्हाईट टायटॅनियम फिनिश या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत.

IPhone 15 pro आणि IPhone 15 pro max किंमत

IPhone 15 pro आणि IPhone 15 pro max दोन्ही स्मार्टफोनच्या किमती स्टोरेज व्हेरिएंट नुसार वेगवेगळ्या आहे. IPhone 15 pro च्या 128 GB मोबाईलची किंमत 1,34,900, 256 GB स्टोरेजची किंमत 1,44,900 रुपये आणि 512 GB स्टोरेजची किंमत 1,64,900 रुपये आहे. जर तुम्हाला IPhone चे स्टोरेज आणखीन वाढवायचे असेल तर 1TB स्टोरेज ची किंमत 1,84,900 रुपये आहे. तर दुसरीकडे IPhone 15 pro max या मॉडेलच्या 512 जीबी स्टोरेज ची किंमत 1,79,900 एवढी असून 256 जीबी स्टोरेज ची किंमत 1,59,900 आणि 1TB स्टोरेज ची किंमत 1,99,900 एवढी आहे.

तुम्हाला आमचा हा मोबाईल रिव्हिव्ह कसा वाटला? हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पहात असाल तर आमचं हॅलो महाराष्ट्र पेज लाईक करा, युट्युबवर सबस्क्राईब करा. लवकरच भेटुयात नवीन मोबाईल अन् नवीन रिव्हिव्हसह. तोपर्यंत बबाय.