iPhone 15 Pro Max ची किंमत MacBook पेक्षा जास्त? ‘या’ फीचर्समुळे मोबाईल महागणार

टाइम्स मराठी । आयफोनचे चाहते असणारे यूजर्स गेल्या अनेक दिवसांपासून iPhone 15 Pro Max ची प्रतीक्षा करत आहेत .खूप दिवसांपासून या मोबाईलची चर्चा सुरु आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात लाँच होणार हा मोबाईल पुरवठा साखळी समस्यामुळे ऑक्टोबरपर्यंत लाँच करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना अजून वाट पाहावी लागेल. तसेच त्याची किंमत मात्र अँपलच्या MacBook पेक्षाही जास्त असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे खरेदीदारांना मोठी आर्थिक झळ बसू शकते.

   

iPhone 15 Pro Max ची किंमत अंदाजे $2,099 असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वात महागडा iPhone बनला आहे. iPhone 15 Pro Max ची इतकी महाग असण्याचे मुख्य कारण म्हंणजे या मोबाईल मध्ये देण्यात आलेलं स्टोरेज आणि त्यातील जबरदस्त फीचर्स… या मॉडेलमध्ये प्रचंड 2TB स्टोरेज क्षमता, टायटॅनियम फिनिश, अपग्रेडेड कॅमेरा क्षमता आणि शक्तिशाली नवीन चिप देण्यात येणार आहे. या सर्व फीचर्समुळेच iPhone 15 Pro Max ची किंमत MacBook पेक्षाही जास्त असेल.

iPhone 15 Pro Max च्या लौंचिंग इतका उशीर का?

iPhone 15 Pro Max लाँच होण्यास उशीर लागतोय याचे मुख्य कारण म्हणजे लीक पुरवठा साखळीमधील आव्हाने.. अॅपल आयफोनसाठी कॅमेरा सेन्सर्सचा सर्वात मोठा पुरवठादार हा Sony आहे. परंतु Sony ने अजूनही इमेज सेन्सर डेव्हलप केलेला नाही. इमेज सेन्सर बनवण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता असून त्याचमुळे iPhone 15 Pro Max लाँच होण्यास उशीर होऊ शकतो. दरम्यान, अॅपलने आपली नवीन सिरीज लाँच करण्यास उशीर करायची ही काय पहिलीच वेळ नाही, यापूर्वी iPhone 14 सुद्धा दिलेल्या तारखेनंतर खुप उशीरा लाँच केला होता.