अखेर प्रतीक्षा संपली! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी iPhone 15 होणार लॉन्च

टाइम्स मराठी | सध्या तरुणांमध्ये आयफोन सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. पाच पैकी तीन व्यक्तींच्या खिशात आयफोन आहेच. त्यामुळे आता iPhone 15 लॉन्च होण्याची वाट सर्वजण आतुरतेने बघत आहेत. या संदर्भातच एक मोठी माहिती समोर आली आहे. कंपनी iPhone15 येत्या 13 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. Apple पार्क कॅलिफोर्निया येथे याचा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात येणार आहे. हा इव्हेंट YouTube चॅनेलद्वारे ऑनलाइन पाहता येऊ शकणार आहे. यामुळे iPhone15 खरेदी इच्छिणाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

   

महत्वाचे म्हणजेच, iPhone15 इव्हेंटसंदर्भात कंपनीने 13 सप्टेंबरनंतर कोणत्याच कर्मचाऱ्याला सुट्टी न घेण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप iPhone 15 लॉन्च संदर्भात कंपनीने कोणतेही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र ती लवकरच होणार असल्याचं म्हणलं जात आहे. Appleच्या लाँचिंग इव्हेंट्सपैकी बहुतेक इव्हेंट मंगळवारी पार पडले आहेत. मात्र यावेळी Apple कंपनीने 13 सप्टेंबर तारीख ठरवल्यामुळे त्या दिवशी बुधवार आला आहे. याबाबतची माहिती 9to5Mac कडून देण्यात आली आहे.

9to5Mac च्या रिपोर्टनुसार, iPhone15 फोन 13 सप्टेंबरला लॉन्च झाला तर कंपनी 15 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर सुरू करू शकते. तसेच कंपनी 22 सप्टेंबरपासून iPhone15 विक्री सुरू करू शकते. कंपनीने iPhone15 मध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स दिले आहेत. iPhone 15 आणि 15 Plus मध्ये कंपनी A16 Bionic चिपसेटला सपोर्ट सिस्टीम देऊ शकते. iPhone 15 Pro आणि 15 Pro Max नवीन A17 चिपवर अवलंबून असेल. कंपनी iPhone15 मध्ये पेरिस्कोप लेन्स देखील देणार आहे. iPhone15 च्या लॉन्चिंग नंतरची किंमत अंदाजे रु 73,900 असू शकणार आहे.