अखेर प्रतिक्षा संपणार! आज होणार iphone 15 चे लॉन्चिंग

टाइम्स मराठी | आज एप्पल कंपनीचा iphone 15 हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे iphone 15 सोबतच आणखीन चार व्हेरियंट देखील कंपनीकडून आज लॉन्च करण्यात येणार आहे.आयफोन घेण्याकडे तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत असतो. एप्पल हा भारतातील तरुणांचा आवडता ब्रँड असून 12 सप्टेंबर म्हणजेच आज रात्री 10.30 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. iphone 15 मध्ये यावर्षी वेगवेगळे अपग्रेड मिळू शकतात. यासोबतच iphone 15 pro मॉडेलच्या किमती देखील जास्त असल्याची शक्यता आहे. यापूर्वी एप्पल कंपनीने लॉन्च केलेला iphone14 नवीन वेगवेगळे फीचर्स देण्यात आले होते आता आयफोन 15 मध्ये कोणते फीचर्स देण्यात येऊ शकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

   

डिझाईन

iphone 15 च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, iphone 14 प्रमाणेच याची डिझाईन असणार आहे. यासोबतच आयफोन पंधराच्या रिअर पॅनल मध्ये फ्रॉस्टेड ग्लास बघायला मिळू शकतो. ॲपल कंपनीने आतापर्यंत या ग्लासचा वापर फक्त प्रो मॉडेल मध्ये केला होता. आयफोन 15 फोनची फ्रेम ॲल्युमिनियम पॅटर्न मध्ये असणार आहे या आयफोनच्या लाईट बटनला लेफ्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. एवढेच नाही तर, आयफोन 15 मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे चार्जिंग वायर लाइटनिंग पेक्षा यूएसबीसीच मध्ये स्विच करण्यात येणार आहे.

स्पेसिफिकेशन

iphone 15 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना SDR OLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. या डिस्प्ले चे रिजॉल्युशन 2532×1170 पिक्सेल एवढा आहे. iphone 15 प्लस यामध्ये 6.7 इंच डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 2778×1284 पिक्सेल रिझोल्युशन प्रदान करतो. त्यानुसार iphone 15 प्लसची साईज मोठी असू शकते. यामध्ये डायनामिक आयलँड फीचर्स देखील बघायला मिळू शकतात. आयफोन 14 च्या प्रो मॉडेल मध्ये हे फिचर अगोदर बघायला मिळालं होतं.

iphone 15 मध्ये हे असेल नवीन

iphone 15 मध्ये बरेच बदल बघायला मिळू शकतात. यासोबतच सर्व आयफोनच्या मॉडेल्स वर USB टाईप C चार्जर देखील कंपनीकडून देण्यात येऊ शकते. यापूर्वी चार्जिंग साठी कंपनीचा प्रोपर्टी चार्जर वापरण्यात येत होता. परंतु आता कोणताही अँड्रॉइड चार्जर ने चार्ज करता येऊ शकतो. एप्पल कंपनी याशिवाय iphone 15 मध्ये A17 बायोनिक चिप, स्टॅंडर्ड मॉडल मध्ये A16 बायोनिक चिप आणि डायनामिक आयलँड देखील मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच कंपनीने ठेवलेल्या लॉन्चिंग इव्हेंट मध्ये आयफोन सोबतच नेक्स्ट जनरेशन स्मार्ट वॉच ची देखील लॉन्चिंग करण्यात येऊ शकते.

कॅमेरा सेटअप आणि नवीन प्रोसेसर

iphone 15 यामध्ये नवीन कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. या सोबतच प्रोसेसर देखील नवीन देण्यात येईल. एवढेच नाही तर यात नवीन सॉफ्टवेअर देखील येऊ शकते. iphone 15 लॉन्च केल्यानंतर airpods pro यासह यूएसबी चार्जिंग केस देखील लॉन्च करण्यात येऊ शकते. आयफोन 15 हा पंधरा कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होऊ शकतो. त्यापैकी पिंक, ब्लॅक, ब्ल्यू आणि येलो आणि प्रो मॉडेल्स ग्रे, ब्लॅक, ब्ल्यू आणि व्हाईट कलर मध्ये मिळतील.

iphone 15pro होऊ शकतो लॉन्च

iphone 15 च्या सर्व सिरीज आणि मॉडेल्समध्ये डायनामिक आयलँड फीचर्स देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच अलर्ट स्लाईडर ऐवजी एक बटन देण्यात येऊ शकते. यासोबतच या लॉन्चिंग इव्हेंट मध्ये iphone 15, iphone plus, iphone 15pro, iphone 15 pro max हे देखील लॉन्च करण्यात येणार आहे. या इव्हेंट बाबत कंपनीने वेबसाईटवर Wonderlust लिहिण्यात आले आहे. हा इव्हेंट कंपनीच्या हेड क्वार्टर एप्पल पार्क वरून लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार असून युट्युब वर देखील हा इव्हेंट पाहता येऊ शकतो.

किंमत

iphone 15 या स्मार्टफोनची किंमत अजूनही उघड झाली नसून एकंदारीत किंमत 799 डॉलर म्हणजेच 65 हजार रुपये असू शकते. तर आयफोन 15 प्लसची किंमत 899 डॉलर म्हणजे 75 हजार रुपये असू शकते. या स्मार्टफोनच्या किमती आज रात्री लॉन्चिंग दरम्यान समजतील.