iPhone 16 Pro Launched : iPhone 16 Pro मध्ये काय खास आहे? चला जाणून घेऊयात

iPhone चे वेड तर आपल्या सर्वानाच असेल. प्रत्येकाला वाटत कि आपल्याकडे iPhone असावा. कारण अँड्रॉइड मोबाईल मध्ये मिळत नाहीत असे अनेक जबरदस्त फीचर्स आयफोन मध्ये असतात. कंपनी सुद्धा सतत अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. नुकतंच Apple ने iPhone 16 Pro लाँच केला (iPhone 16 Pro Launched) आहे. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max अशा २ प्रकारात हा मोबाईल लाँच करण्यात आला आहे. आज आपण या आयफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

   

iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा, तर 16 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तर iPhone 16 Pro Max मध्ये 6.9 इंच डिस्प्ले आहे. iPhone 16 Pro लाइनअपमध्ये A18 Pro चिपसह 16-कोर न्यूरल इंजिन देण्यात आलं आहे. मोबाईलचे ग्राफिक्स देखील सुधारले गेले आहेत, ज्यासाठी 6-कोर GPUवापरण्यात आला आहे. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये USB 3.0 Type-C पोर्ट मिळतो. यात 27W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच MagSafe आणि Qi वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळतो. दोन्ही फोन IP68 रेटेड आहेत.

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप- iPhone 16 Pro Launched

कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, iPhone 16 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 48MP फ्यूजन कॅमेरा आहे. 48MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने नवीन कॅमेरा कंट्रोल बटण दिले आहे. त्याच्या मदतीने कॅमेरा सहज चालू करता येतो आणि फोटो क्लिक करता येतात. याशिवाय या कंट्रोल बटन्सच्या साहाय्याने मोडही बदलता येतात. (iPhone 16 Pro Launched)

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, भारतात iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे, ज्यामध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध असेल. तर दुसरीकडे iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,44,900 रुपये आहे. यामध्ये 256GB स्टोरेज मिळतेय. हा मोबाईल ब्लॅक, व्हाइट नॅचरल आणि डेझर्ट टायटॅनियम रंगात उपलब्ध असून 13 सप्टेंबरपासून त्याची प्री-ऑर्डर सुरु होईल असं कंपनीने म्हंटल आहे.