Apple चा ग्राहकांना अलर्ट!! Mobile चार्जिंग करताना ‘या’ चुका केल्यास होईल स्फोट

टाइम्स मराठी । आज- काल स्मार्टफोन शिवाय आपले कोणतेच काम होऊ शकत नाही. यासोबतच आपण दिवसभर मोबाईल वापरल्यानंतर रात्रीच्या वेळी मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य समजतो. परंतु ही पद्धत अत्यंत चुकीची असून नुकताच लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनीने ही धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं आहे. तसेच आपल्या ग्राहकांना याबाबत अलर्ट सुद्धा केलं आहे. भारतात एप्पल (Apple iPhone) या मोबाईल कंपनीचा ब्रँड प्रत्येक तरुणांना आवडतो. या कंपनीचे मोबाईल घेण्याकडे प्रत्येक तरुणाई आकर्षित होते. परंतु आता एप्पल कंपनीने आयफोन यूजर साठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. जर ही चूक तुम्ही देखील करत असाल तर आयफोन चा स्पोट होऊ शकतो असं कंपनीने सांगितलं आहे.

   

मोबाईल(Mobile) फोन चार्ज करण्यासाठी रात्री बरेच जण मोबाईल चार्जिंगला लावतात. आणि त्यानंतर झोपतात. परंतु हे चुकीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मोबाईल फोन रात्री चार्जिंगला न लावण्याचा इशारा बऱ्याचदा दिला जातो. त्याच प्रकारे आता एप्पल कंपनीने देखील हा इशारा दिला आहे. जर तुम्ही तुमचा आयफोन चार्ज होत असताना झोपलात तर नुकसान होऊ शकते. कारण बऱ्याचदा चार्जिंगला लावल्यामुळे आग, इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. यासोबतच दुखापत किंवा मोबाईल सहित बाकीच्या वस्तूंचे नुकसान होऊ शकते.

याशिवाय बऱ्याचदा काहीजण मोबाईल रात्री चार्जिंगला लावून उशीच्या जवळ ठेवतात. आणि त्यामुळे मोबाईलला हवा मिळत नाही. यामुळे ओव्हर हीट होऊ शकते आणि तुमच्या मोबाईलचे नुकसान होऊ शकतं. एवढेच नाही तर आग लागण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावत असताना मोकळ्या ठिकाणी ठेवा जेणेकरून मोबाईलला हवा लागेल.

एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी थर्ड पार्टी चार्जर वापरतात तेव्हा देखील स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो. खास करून एप्पल उत्पादनासाठी हे सुरक्षित नसून यामुळे आयफोन चा लवकर स्पोट होतो. ऑफिशियल सेफ्टी मेमो मध्ये एप्पल कंपनीने सांगितलं की, मोबाईल डिवाइस पॉवर अडप्टर किंवा वायरलेस चार्जर वर झोपू नका. कारण ते पावर सोर्स सोबत जोडलेले असतात. तसेच तुमचे मोबाईल चार्जर पॉवर अडप्टर या सर्व गोष्टी हवेशीर ठेवा.