Iphone यूजर्ससाठी आनंदाची बातमी; नवीन फीचर्स आणि रिंगटोनसह लाँच होणार iOS 17 अपडेट

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Apple आयफोन युजरसाठी लवकरच ios 17 ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करणार आहे. एवढेच नाही तर या ऑपरेटिंग सिस्टिम सोबतच Apple कडून रिंगटोन देखील लॉन्च करण्यात येणार आहे. याबाबत Apple कंपनीने WWDC 2023 या इव्हेंटमध्ये अपकमिंग iOS 17, ipadOS 17, MacOS 10, watchOS 10 आणि tvOS 17 यांची घोषणा केली. त्यानुसार आता हे सर्व अपडेट 18 सप्टेंबरला डाउनलोडसाठी खुले करण्यात येणार आहे.

   

मिळालेल्या माहितीनुसार, एप्पल कनेक्टिव्हिटी आणि डेली रुटीनसाठी नवीन फीचर्ससह वीस नवीन रिंगटोन आणि साऊंड चेंज ऑप्शन देणार आहे. सध्या iOS 17 या अपडेटची बीटा टेस्टिंग सुरू असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध असणार आहे. हे फीचर्स डेली रुटीन मध्ये वापरात येतील असं देखील या इव्हेंटमध्ये सांगण्यात आले.

या नव्या अपडेटनुसार, Apple कंपनीने लॉक स्क्रीन आणि होम स्क्रीनला नव्याने अपडेट केले आहे. या अपडेट मध्ये आता फर्स्ट पार्टी आणि थर्ड पार्टी दोन्ही एप्लीकेशनला हे सपोर्ट करेल. त्याचबरोबर यूजरसाठी सर्वात मोठे अपडेट म्हणजे आयफोन एकत्रित आणून सहजरीत्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी परमिशन देण्यात आली आहे.

ॲपल कंपनीने या अपडेटमध्ये आता ॲपल टीव्ही वरून कॉल करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडून फेस टाइम कॉल चुकल्यास ऑडिओ आणि व्हिडिओ मेसेज पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर यामधील खास फीचर म्हणजे आयफोन आता सूचनाकेंद्र आणि डिस्प्लेच्या माध्यमातून देखील वापरला जाऊ शकतो. हा एक स्टँड बाय मोड आहे. या मोड मध्ये डिस्प्ले, टाइमिंग नोटिफिकेशन, यासारखे बरेच ऑप्शन उपलब्ध करण्यात आले आहे. हे फीचर जेव्हा तुमचा आयफोन चार्जिंगला लावलेला असेल तेव्हाच काम करेल.

या अपडेट मध्ये आणखीन एक फीचर चा वापर करण्यात आला आहे. हे फीचर म्हणजे एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड लोकेशन शेअरिंग हे आहे. या फीचरच्या माध्यमातून डेली रुटीन, कॉन्टॅक्ट, लोकेशन यासारख्या बऱ्याच गोष्टींचा आढावा घेतला जाईल. यामुळे मित्र, फॅमिली, यांना एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड लोकेशन शेअर करण्यात येईल.

ॲपल कंपनीने आणलेले हे iOS 17 अपडेट काही आयफोन्सला उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये Iphone 15, Iphone 15 प्लस, Iphone 15 प्रो, Iphone 15 प्रो मैक्स, Iphone 14, Iphone 14 प्लस, Iphone 14 प्रो, Iphone 14 प्रो मैक्स, Iphone 13, Iphone 13 मिनी, Iphone 13 प्रो, Iphone 13 प्रो मैक्स, Iphone 12, Iphone 12 मिनी, Iphone 12 प्रो, Iphone 12 प्रो मैक्स, Iphone 11, Iphone 11 प्रो, Iphone 11 प्रो मैक्स, Iphone एक्सएस, Iphone एक्सएस मैक्स, Iphone एक्सआर, iPhone SE। या Iphone चा समावेश होतो.