iQ00 Z7 Pro 5G लवकरच होणार लाँच; पहा संपूर्ण डिटेल्स

टाइम्स मराठी । iQ00 ही स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच आपला नवीन हँडसेट iQ00 Z7 Pro 5G भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वी या स्मार्टफोनचा लुक आणि डिझाईनबद्दल खुलासा करण्यात आला आहे. याबाबत iQ00 कंपनीच्या भारतीय युनिटचे सीईओ निपुण मार्या यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आणि टीजर शेअर केलाय. त्यानुसार हा मोबाईल कसा असू शकतो याचा अंदाज तुम्हाला घेता येईल. आज आपण या स्मार्टफोनचे फीचर्स, कॅमेरा क्वालिटी आणि किंमत याबाबत जाणून घेऊयात.

   

6.38 इंच डिस्प्ले –

iQ00 Z7 Pro हा स्मार्टफोन टीझर मध्ये कर्व्ह डिस्प्ले, स्लिम साईड बेजल्स आणि सेल्फी कॅमेरा साठी सेंटर पंच होल कट आउट मध्ये उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. iQ00 Z7s या स्मार्टफोनमध्ये 6.38 इंच चा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला होता. त्याचबरोबर iQ00 Z7 pro 5G या स्मार्टफोन मध्ये 1080×2400 पिक्सल रिझोल्युशन आणि 120 Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78 इंच चा कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. मोबाईलच्या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये डायमेंसिटी 7200 प्रोसेसर देण्यात येऊ शकते.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, iQ00 Z7 Pro या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्ट सह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर, 2 मेगापिक्सल चा सेकंडरी शूटर कॅमेरा, तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. मोबाईलमध्ये 4600mAh बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती –

कंपनीकडून iQ00 Z7 Pro या स्मार्टफोनची किंमत जाहीर करण्यात आली नसली तरी या मोबाईलची किंमत अंदाजे 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. iQ00 Z7 Pro हा मोबाईल मोटोरोला एज 40, पोको एफ5 5G, गुगल पिक्सल 6ए आणि नथिंग फोन 1 या स्मार्टफोनला थेट टक्कर देईल.