IQOO ने लाँच केला आकर्षक Mobile; 50MP कॅमेरा, 200 W फास्ट चार्जिंग अन् बरंच काही

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी IQOO ने आपला नवा मोबाईल IQOO 11S हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 16GB पर्यंत RAM आणि 1TB मोबाईल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे. या मोबाइलच्या किमती त्याच्या व्हेरिएन्ट नुसार वेगवेगळ्या आहेत. आज आपण या मोबाईलचा डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

   

6.78 इंच डिस्प्ले –

IQOO 11S या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा क्वाड HD, क्वर्ड E6 LTPO 4.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्ले मध्ये पंच होल डिझाईन देण्यात आली असून हा डिस्प्ले 2K रिझोल्युशन सह 144Hz हाय रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ही स्क्रीन 1800 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस देते. मोबाईलला Qualcomm snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Origin OS 3.0 वर काम करतो.

कॅमेरा

IQOO 11S मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP प्रोट्रेट लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आलाय. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतोय.

अन्य फीचर्स –

IQOO 11S मध्ये 4,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 200W USB टाइप C वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन ड्युअल सिमकार्ड ला सपोर्ट करत असुन कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये फाईव्ह जी नेटवर्क, ब्लूटूथ, वायफाय 7 देण्यात आलेले आहेत.

किंमत किती?

IQOO 11S हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनमध्ये लाँच झाला असून त्याची किंमत ही स्टोरेज व्हेरिएन्ट नुसार वेगवेगळी आहे. यातील 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 3799 युआन म्हणजेच 43 हजार रुपये आहे. 16 GB रॅमसह 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टचची किंमत 4099 युआन म्हणजे 46,545 रुपये आहे तर 16 जीबी रॅमसह 512 GB स्टोरेज व्हेरियेण्टची किंमत 4399 युआन म्हणजेच 50 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.