iQOO ने लाँच केलं पहिलेवाहिले Smartwatch; eSIM सुविधा मिळतेय, किंमत किती?

टाइम्स मराठी । बाजारात सध्या स्मार्टवॉचची चांगलीच चलती आहे. खिशात मोबाईल असला तरी रुबाबदार आणि रॉयल दिसावं, जनमानसात आपली छाप पडावी म्हणून अनेकजण हातात स्मार्टवॉच घालत असल्याचे आपण बघितलं असेल. बाजारात अनेक कंपन्या अपडेटेड फीचर्ससह नवनवीन स्मार्टवॉच लाँच करत असतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रसिद्ध ब्रँड iQOO ने iQOO Watch लाँच केलं आहे. यामध्ये कंपनीने eSIM सपोर्ट सुद्धा दिलेले आहे. एवढच नव्हे तर एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हे स्मार्टवॉच तब्बल ७ दिवस बॅटरी बॅकअप देतेय. आज आपण या स्मार्टवॉचचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात…

   

iQOO च्या या स्मार्टवॉचमध्ये 1.43-इंचाचा गोल आकाराचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 466 x 466 पिक्सेल रिझोल्यूशन मिळत. हे स्मार्टवॉच BlueOS सिस्टीम वर काम करत असून यामध्ये तुम्हाला ई-सिम, स्पीकर आणि मायक्रोफोन यांसारखे फीचर्स मिळतील. या स्मार्टवॉच मध्ये हेल्थ मॉनिटरिंग फीचर सुद्धा उपलब्ध असून हार्ट रेंट सेंसर मिळतेय. हे सेन्सर सलग २४ तास आपलं काम सुरूच ठेवत. तसेच तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी एक SpO2 सेन्सर देखील कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये दिले आहे. म्हणजेच तुमच्या आरोग्याबाबत सर्व अपडेट तुम्हाला या स्मार्टवॉचच्या माध्यमातून मिळत राहील. या स्मार्टवॉच मध्ये 505mAh बॅटरी मिळत असून एकदा हे स्मार्टवॉच फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 7 दिवस टिकू शकते.

या स्मार्टवॉचच्या माध्यमातून तुम्ही किती स्ट्रेस मध्ये आहात हे सुद्धा तुम्हाला समजते. याशिवाय स्लीप ट्रॅकर देखील यामध्ये आहे. महिलांसाठी सुद्धा हे उपयोगी आहे कारण महिलांच्या आरोग्याशी संबंधित मासिक पाळी ट्रॅकिंग फीचरही कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये दिले आहे. iQOO च्या या स्मार्टवॉचमध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड मिळतात. या स्मार्टवॉच मध्ये कॅमेरा, क्यूआर कोड पेमेंट, एनएफसी कार की, म्युझिक कंट्रोल यांसारख्या अनेक फीचर्सचाही यात समावेश आहे

किंमत किती?

iQOO च्या या स्मार्टवॉचच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, यातील बेस मॉडेलची किंमत CNY 1,099 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 12,900 रुपये आहे, तर e-SIM सपोर्ट असलेल्या स्मार्टवॉचची CNY 1,299 म्हणजेच 15,000 रुपये आहे.