iQOO ने लाँच केला नवा मोबाईल; 16 GB रॅम, किंमत किती?

टाईम्स मराठी | प्रसिध्द कंपनी iQOO ने जागतिक बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. iQOO Neo 8 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 16 GB रॅम आणि 1Tb पर्यंत इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किमतीबाबत…..

   

डिस्प्ले-

iQOO Neo 8 मध्ये कंपनीने 6.78 इंच चा AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1.5 K रिझोल्युशन आणि 144 HZ रिफ्रेश रेट सह मिळतो. या मोबाईलचा डिस्प्ले 1300 निट्स ब्राईटनेस सह उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर दिला आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर बेस्ड ORIGINOS 3 वर काम करतो.

कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, iQOO Neo 8 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार OIS सपोर्ट सह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा मिळतोय तर समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये VC लिक्विड कूलिंग हीट डिसिपेशन सिस्टीम उपलब्ध केली आहे.

फीचर्स-

iQOO Neo 8 या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी Wifi, ब्लूटूथ, GPS यासारखे स्टॅंडर्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच पॉवर साठी यामध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 120 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

iQOO Neo 8 हा मोबाईल 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार या व्हेरिएंट ची किंमत 3699 युवान म्हणजेच भारतीय चलनानुसार 40,000 रुपये एवढी आहे. तर या स्मार्टफोनच्या 16 GB रॅम आणि 516 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 3099 युवान म्हणजेच 35,200 रुपये आहे.