iQOO Neo 9 Series : iQOO Neo 9 सिरीज लाँच; 50MP कॅमेरा, 5,150mAh बॅटरी अन बरंच काही….

iQOO Neo 9 Series । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड iQOO ने चिनी बाजारात Neo 9 सिरीज लाँच केली आहे. कंपनीने या सिरीज अंतर्गत iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro हे २ मोबाईल लॉन्च केले आहेत. हा मोबाईल लाल, काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. लवकरच हे दोन्ही मोबाईल भारतीय मार्केट मध्ये सुद्धा लाँच होऊ शकतात. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊया.

   

iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro या दोन्ही मोबाईल मध्ये कंपनीने 144Hz रिफ्रेश रेट सह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. यातील iQOO Neo 9 या मोबाईल मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे तर iQOO Neo 9 Pro मध्ये तुम्हाला Dimensity 9300 चिपसेट मिळेल. iQOO ने लाँच केलेले हे दोन्ही मोबाईल Android 14 वर आधारित UI वर काम करतात.

कॅमेरा – iQOO Neo 9 Series

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, iQOO Neo 9 मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX920 प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा देण्यात आला आहे तर iQOO Neo 9 Pro मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा मिळतोय. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी दोन्ही मोबाईलला समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO Neo 9 Series

iQOO Neo 9 आणि Neo 9 Pro दोन्ही स्मार्टफोन मध्ये 5,160mAh ची बॅटरी मिळत असून ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्स बाबात सांगायचं झाल्यास, या दोन्ही मोबाईल मध्ये ड्युअल स्पीकर, आयआर ब्लास्टर, एक्स-अॅक्सिस लिनियर मोटर, वाय-फाय 7 सारखे दमदार फीचर्स मिळतात.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा… तर iQOO Neo 9 च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 2,299 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 27,600 रुपये पासून सुरू होते. तर 16GB + 256GB ची किंमत 30,100 रुपये, 16GB + 512GBची किंमत 33,700 रुपये आणि 16GB + 1TB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 39950 रुपये आहे.

तर iQOO Neo 9 Pro च्या 12GB + 256GB स्टोरेजची किंमत 36,100 रुपये, 12GB +512GB व्हेरिएन्टची किंमत 39,700 रुपये, 16GB + 512GB मोबाईलची किंमत 43,300 रुपये आणि 16GB रॅम सह 1TB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 48,100 रुपये आहे.