iQOO Neo 9 Pro : 50 MP कॅमेरा, 12GB रॅम; iQOO ने लाँच केला मस्त मोबाईल

iQOO Neo 9 Pro : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड IQOO ने भारतीय बाजारपेठेत एक नवा मोबाईल लाँच केला आहे. iQOO Neo9 Pro असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 12GB रॅम यांसारखी अनेक दमदार फिचर देण्यात आले आहेत. उद्यापासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

iQOO Neo 9 Pro मध्ये 6.78-इंचाचा 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 1 ते 144Hz पर्यंत असून त्याला 2800×1260 पिक्सल रिझोल्यूशन मिळते. कंपनीने या मोबाईलमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोबाईलमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, टाइप-सी, स्टिरिओ स्पीकर यांसारखे अन्य फीचर्स मिळतात.

50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा- iQOO Neo 9 Pro

मोबाईलच्या कॅमेरा सेटअप बाबत सांगायचं झाल्यास, iQOO Neo 9 Pro मध्ये पाठीमागील बाजूल 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 5160mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 120W अल्ट्रा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

iQOO Neo 9 Pro हा मोबाईल एकूण ३ स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये आणला आहे. यातील 8GB + 128GB मॉडेलची किंमत 35,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेलची किंमत 37,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे. उद्यापासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन Amazon आणि Iku ऑनलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही हा मोबाईल लाल आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता.