IQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च, 64 MP कॅमेरा, 6.78 इंच डिस्प्ले आणि बरंच काही

टाइम्स मराठी | स्मार्टफोन निर्माता कंपनी iQ00 आपला एक नवीन आणि आकर्षक असा हँडसेट भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. या कंपनीने मे महिन्यामध्ये iQ00 Z7s लॉन्च केला होता. आता कंपनीने IQOO Z7 Pro 5G हा स्मार्टफोन मीड रेंजमध्ये लॉन्च केला आहे. हा मोबाईल 2 स्टोरेज व्हेरीएन्ट मध्ये लॉन्च करण्यात आला असून 5 सप्टेंबर ला 12 वाजता तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यासोबतच या मोबाईलच्या खरेदीवर कंपनीने बँक ऑफर्स देखील दिल्या आहेत. चला तर मग आज आपल्या मोबाईल रिविव्ह मध्ये IQOO Z7 Pro 5G चे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

IQOO Z7 Pro 5G स्पेसिफिकेशन

IQOO Z7 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये 6.78 इंच चा कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिझोल्युशन आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याचबरोबर यामध्ये 1300 नीट्स पीक ब्राईटनेस आणि 1200 हर्टज टच सॅम्पलिंग रेट देखील देण्यात आला आहे. iQ00 Z7 pro 5G मध्ये देण्यात येणाऱ्या या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये डायमेंसिटी 7200 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 4600mAh बॅटरी सह येत असून ही बॅटरी 66 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा क्वालिटी– IQOO Z7 Pro 5G

या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्ट सह 64 मेगापिक्सल चा प्रायमरी रियर कॅमेरा सेंसर, 2 मेगापिक्सल चा सेकंडरी शूटर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूस 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 8 GB रॅम + 256 GB इनबील्ड स्टोरेज अशा 2 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

किंमत

IQOO Z7 Pro 5G या स्मार्टफोनची किंमत 8 GB रॅम आणि 256 GB इनबील्ड स्टोरेज साठी 24,999 एवढी आहे. आणि 8 GB रॅम आणि 128GB इनबील्ड स्टोरेज साठी 23,999 रुपये एवढी आहे. जर तुम्ही एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या कार्ड वरून पेमेंट करत असाल तर तुम्हाला ऑफरनुसार 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.