iQOO लाँच करणार 2 दमदार Mobile; 6000mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा अन बरंच काही

टाइम्स मराठी । iQOO कंपनी दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नुकताच कंपनीने या स्मार्टफोनचा टिझर लॉन्च करत लॉन्चिंग तारीख सांगितली. या स्मार्टफोनचं नाव iQOO Z8 आणि iQOO Z8x असं असून येत्या 31 ऑगस्टला हे स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात येतील. या दोन्ही मोबाईलच्या लौंचिंग पूर्वी त्यांची खास फीचर्स जाणून घेउयात.

   

iQOO Z8 स्पेसिफिकेशन-

iQOO Z8 या स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच एलसीडी पॅनल देण्यात आलेले असून 2388×1080 पिक्सेलच्या FHD रिझोल्युशन सोबत उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 120W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन 3.0 वर बेस्ड अँड्रॉइड 13 वर काम करतो. iQOO Z8 स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यात ड्युअल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 MP, डेप्थ कॅमेरा 2MP, आणि 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. स्मार्टफोन मध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटी साठी यात 3.5 mm ऑडिओ जॅक उपलब्ध असून साईड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देखील उपलब्ध आहे.

iQOO Z8x स्पेसिफिकेशन

iQOO Z8x हा स्मार्टफोन 6.64 इंच LCD पॅनल सोबत उपलब्ध असून 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅप ड्रॅगन 6 जेन चिप्स वापरण्यात आली आहे. iQOO Z8x मध्ये पावर बॅकअप साठी 6000mAh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 44W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. iQOO Z8 प्रमाणे हा स्मार्टफोन देखील 3.0 वर बेस्ड अँड्रॉइड 13 वर काम करतो. iQOO Z8x या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यात प्रायमरी कॅमेरा 50 MP, सेकंडरी कॅमेरा 2MP, सेल्फी कॅमेरा 8MP देण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनेट स्टोरेज सोबत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.