16 GB रॅमसह IQOO12 आणि IQOO12 PRO लाँच; किंमत किती पहा

टाइम्स मराठी । IQ कंपनीचे वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता कंपनीने IQOO 12 SERIES मध्ये 2 नवीन मोबाईल लॉन्च केले आहे. या दोन्ही मॉडेल चे नाव IQOO12 आणि IQOO12 PRO आहे. कंपनीने यापूर्वी IQOO 11 सिरीज मध्ये हे दोन्ही मॉडेल लॉन्च केले होते. आता या दोन्ही मॉडेलची अग्रेडेड व्हर्जन कंपनीने 12 सिरीज लॉन्च केले आहे. सध्या हा मोबाईल चिनी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला असून 12 डिसेंबरला हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च होईल. ऑफिशियल लाँचिंग नंतर हा स्मार्टफोन ई- कॉमर्स साईट Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

   

IQOO12 आणि IQOO12 PRO स्पेसिफिकेशन

IQOO12 आणि IQOO12 PRO दोन्ही मोबाईलमध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. IQOO12 या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच चा फ्लॅट AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1.5 K रिझोल्युशनसह 144 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. त्याचबरोबर IQOO12 PRO या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंच चा कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2K रिझोल्युशन ऑफर करतो.

IQOO12 कॅमेरा

IQOO12 या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 50 MP, अल्ट्राव्हाइड लेन्स 50 MP, टेली फोटो पेरिस्कोप लेन्स 64 MP, 3X ऑप्टिकल झूम, 100 डिजिटल झूम सपोर्ट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 16 MP कॅमेरा देण्यात आला आहे.

IQOO12  किंमत

IQOO12  मोबाईलच्या किमती बद्दल जाणून घेऊया. IQOO12 या स्मार्टफोनमध्ये तीन स्टोरेज व्हेरियंट दिले आहे. त्यानुसार 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 3999 युआन म्हणजे 46400 रुपये आहे. 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4299 यूआन म्हणजेच  49,900 रुपये आहे. 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 4699 युवान म्हणजे 54,600 रुपये आहे.

IQOO12 PRO कॅमेरा

IQOO12 PRO या स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्ट सह 50 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 50 MP अल्ट्रावाईड  कॅमेरा, 64 MP  पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय 16 MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या कॅमेरा सोबतच 3x ऑप्टिकल झूम आणि  100 x डिजिटल झूम मिळते. या स्मार्टफोनमध्ये 1000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी  120 W वायर्ड आणि 50 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

 IQOO12 PRO  कनेक्टिविटी फीचर्स

IQOO12 PRO या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये गेमिंग साठी Q1 डिस्प्ले चिप देण्यात आली आहे. यासोबतच  wifi , ड्युअल सिम 5G, NFC, ड्युअल फ्रिक्वेन्सी GPS, IR ब्लास्टर, ड्युअल स्टीरियो स्पीकर, हॅप्टिक फीडबॅक साठी एक्स ऍक्सेस लीनियर मोटर देण्यात आली आहे.

किंमत

IQOO12 PRO या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या 16 GB रॅम आणि 256 GB व्हेरीएंट ची किंमत 499 युवान म्हणजेच 58,000 रुपये आहे. 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5699 म्हणजेच 63,800  रुपये आहे. या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिएंट म्हणजे 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 599 युवान म्हणजेच 69,700 रुपये आहे.