Israel-Hamas War | 450 वर्षांपूर्वीच करण्यात आली होती हमास- इस्रायल युद्धाची भविष्यवाणी

टाइम्स मराठी । सध्या हमास आणि इस्रायल मध्ये भयंकर युद्ध सुरु असून या युद्धात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 7 ऑक्टोबर पासून सुरु झालेलं हे युद्ध अजूनही काय थांबायचं नाव घेइना. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झालेला पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? हमास- इस्रायल युद्धाबाबत 450 वर्षांपूर्वीच फ्रान्सच्या नॉस्ट्रॅडॅयमस यांनी ही भविष्यवाणी केली होती. तेव्हा केलेली ही भविष्यवाणी आता खरी ठरल्याचं उघड होत आहे.

   

काय केली होती भविष्यवाणी- Israel-Hamas War

नॉस्ट्रॅडॅयमस यांच्या लेस प्रोफेसीज या पुस्तकांमध्ये याबाबत छापलेले आहे. त्यानुसार 2023 मध्ये महायुद्ध होईल असं भीतीदायक वक्तव्य यामध्ये लिहिले आहे. एवढेच नाही तर सात महिन्यांचे हे मोठे युद्ध असेल आणि अनेक लोकांचा यामुळे बळी जाईल असं देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे. नॉस्ट्रॅडॅयमस यांनी पाच शतकांपूर्वी केलेली ही भविष्यवाणी आता जगामध्ये चर्चेचा विषय बनली असून लेस प्रोफेसीज या पुस्तकामध्ये एकूण 6,338 भाकित नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये धोक्याचा इशारा असून अमेरिकेच्या डॉलर मध्ये देखील मोठी घसरण होईल असं देखील यात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर फ्रान्सच्या नॉस्ट्रॅडॅयमस यांच्या भविष्यवाणीनुसार जगातील बऱ्याच भागांमध्ये भीषण, आग, दुष्काळ, भूकबळी, पूरस्थिती निर्माण होऊ शकते असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या संपूर्ण जगात हमास- इस्रायल युद्ध (Israel-Hamas War) केंद्रस्थानी आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात आत्तापर्यंत 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बरेच अमेरिकी नागरिक बेपत्ता आहेत. हे युद्ध मोठ्या प्रमाणात वाढले असून हमास या दहशतवादी संघटनेने कब्जा केलेल्या गाझा पट्टीमध्ये 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या सैनिकांनी देखील अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून दुश्मनांचा खात्मा करण्यासाठी सुरुवात केली आहे.